शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

१० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा भरला भव्यदिव्य स्नेहमेळवा : उरुळी कांचन


 प्रतिनिधी (सुनिल थोरात) 

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे हवेली, (उरुळी कांचन) तब्बल १७ वर्षांनी महात्मा गांधी विद्यालयाच्या २००५ च्या इयत्ता १० वीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी २७ ऑक्टोबर २०२२ गुरुवारी स्नेहमेळवा आयोजित केला होता. या सर्व कार्यक्रमाची गडबड गेले अडीच महिने अगोदरच चालू झाली, आपापल्या कामात व्यस्त असणारे सर्व आपल्या शाळेतील जुन्या मित्रमंडळीना भेटायला आतुर झाले होते, त्यासाठी नियोजन सुरू झाले, त्यासाठी एकमेकांना संपर्क साधून तब्बल ३०६ विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होण्याची तत्परता दाखवली व त्यामधील १०० पेक्षा अधिक मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या.

          या सर्व स्नेहमेळाव्या साठी अथक परिश्रम घेतलेली नियोजन समिती निलेश कांचन, सुधीर गायकवाड, गणेश कोलते, विशाल जावळे, संतोष चौधरी, प्रफुल्ल मुखवटे, नितीन जोशी, जितेंद्र बडेकर ,किसन टिळेकर, अविनाश तुपे, योगेश टिळेकर, मोरेश्वर बगाडे ,जीवन आतकिरे केले. तसेच मुलींमध्ये रामेश्वरी कांचन ,श्रद्धा क्षिरसागर, प्रज्ञा हिरवे, प्रतिमा सुपणार, कीर्ति कांचन, अश्विनी क्षिरसागर, मनाली बारवकर, अनुप्रिता वैराट, यामिनी तुपे, विद्या बधे, प्राजक्ता गायकवाड, तृप्ती कोलते यांनी सहकार्य केले. 

           कार्यक्रमाची सुरुवात गुरुजनांच्या स्वागताने झाली, सर्व शिक्षकांचे सुमधूर संगीताने जोरदार स्वागत झाले. बुद्धीची देवता श्री गणेश व शारदेचे, पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व आजी -माजी शिक्षकांचे सत्कार स्मृतिचिन्ह व  पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. भारावून गेलेल्या वातावरणात शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही विद्यार्थ्यांनीही आपले मगोगत आणि शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या. हॉल संपूर्ण आनंदी वातावरणाने भरून गेला होता. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा संकुला साठी काही देणगी स्वरूपात रक्कम संस्थेचे विद्यमान प्राचार्य भारत भोसले व बाकी शिक्षक वृंद यांच्या कडे सुपूर्त केली. माजी विद्यार्थ्यांचे प्रशालेबद्दलची कळकळ ,प्रेम पाहून या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनानी झाली. 

              या सर्व कार्यक्रमाचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून केले होते. तसेच शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी शाळेला आर्थिक मदत केली. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान गडकोट संवर्धनासाठी स्वराज्य निधी देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post