शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर झाला : वंचित युवा आघाडी संघर्षाचा आंदोलनाचा पवित्रा___रेल्वेने वेळापत्रक केले जारी__


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


मुंबई : महापरिनिर्वाण अभिवादन करण्यात रेल्वेने निर्माण केलेला अडथळा दूर झाला,वंचित बहुजन युवा आघाडीने  संघर्षाचा पवित्रा घेत आंदोलन करण्याचा इशारा देणारे ईमेल कालच रेल्वे अधिकारी ह्यांना पाठवले होते. त्यावर आज मुंबई मध्ये रेल्वे अधिकारी ह्यांच्या बैठकीत ह्या गंभीर विषयांवर चर्चा होवून ५ आणि ६ डिसेंबरचा ब्लॉक  रद्द न करता रद्द केलेल्या ट्रेन्स आणि विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.

          ब्लॉक असेल मात्र आंबेडकरी अनुयायी ह्याना कुठल्याही पध्दतीने त्रास होणार नाही, त्यामुळे अमरावती, गोंदिया, सेवाग्राम तसेच १४ विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई येथील रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दूरध्वनी वरून दिली. त्याच बरोबर १४ विशेष रेल्वे देखील त्या दिवशी सोडणार असल्याने आंबेडकरी अनुयायांना गैरसोय होणार नाही. हे देखील कळविले आहे. ह्या ट्रेन वेळेत चालविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे महापरिनिर्वाण दिनाच्या दिवसाचे गांभिर्य न जपणारे ते अधिकारी कोण आहेत आणि ६ डिसेंबर च्या पूर्वसंध्येला हा मेगाब्लॉक का घेण्यात आला होता, ह्याची चौकशी करण्यात यावी. ह्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार वंचित युवा आघाडीने केला आहे.

            डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ३ स्पेशल गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ स्पेशल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ स्पेशल गाड्या कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान, २ स्पेशल गाड्या धावतील. 



         सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि एक विशेष गाडी अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावेल आणि विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे-

 

(अ) नागपूर-मुंबई अनारक्षित विशेष (३)

 

३) विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूरहून ४/१२/२०२२ रोजी २३:५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५:३० वाजता पोहोचेल.


२.) विशेष गाडी क्रमांक ०१२६४ ही ५/१२/२०२२ रोजी सकाळी ०८:०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि त्याच दिवशी २३.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

          ३.) विशेष गाडी क्रमांक ०१२६६ ५/१२/२०२२ रोजी नागपूरहून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.


      थांबे असे खालील प्रमाणे असतील 


अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.

रचना


विशेष गाडी क्रमांक ०१२६२:- १६ सामान्य द्वितीय श्रेणी. विशेष गाडी क्रमांक ०१२६४ आणि ०१२६६ :- १२ सामान्य द्वितीय श्रेणी

 

(ब) मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर अनारक्षित विशेष (६)

 

१.) विशेष गाडी क्रमांक ०१२४९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६/१२/२०२२ रोजी १६.४५ वाजता सुटेल. आणि अजनीला दुसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल.


२.) विशेष गाडी क्रमांक ०१२५१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ६/१२/२०२२ 6. रोजी १८.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.३० वाजता सेवाग्राम येथे पोहोचेल.

३.) विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर ७/१२/२०२२ रोजी ००.४० वाजता (६/७.१२.२०२२ रोजी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी १५.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

४.) विशेष ट्रेन क्रमांक ०१२५५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७/१२/२०२२ 7 रोजी १२.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता नागपूरला पोहोचेल

५.) विशेष गाडी क्रमांक ०१२५७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०८/१२/२०२२ रोजी १८.३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता नागपूरला पोहोचेल.

०६) विशेष गाडी क्रमांक ०१२५९  दादर ८.१२.२०२२ रोजी (७/८/१२/२०२२ च्या मध्यरात्री) ००.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.५५ वाजता अजनीला पोहोचेल.

थांबे असे असतील

         दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

रचना

विशेष गाडी क्रमांक ०१२४९, ०१२५५, ०१२५७ आणि ०१२५९ :- १६ सामान्य द्वितीय श्रेणी.

विशेष ट्रेन क्रमांक ०१२५१ आणि ०१२५३ :- १२ सामान्य द्वितीय श्रेणी

(C) कलबुर्गी-मुंबई अनारक्षित विशेष (2)

१.) विशेष गाडी क्रमांक ०१२४५ कलबुर्गी ०५/१२/२०२२ रोजी १८.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

२.) विशेष ट्रेन क्रमांक ०१२४६ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७/१२/२०२२ रोजी (६/७.१२.२०२२ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.३० वाजता कलबुर्गी येथे पोहोचेल.

थांबे असे असतील

गंगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.

रचना: ७ सामान्य द्वितीय श्रेणी.


(ड) सोलापूर-मुंबई अनारक्षित विशेष (२)

 

१.) विशेष गाडी क्रमांक ०१२४७ ही ५.१२.२०२२ रोजी २२.२० वाजता सोलापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला पोहोचेल.

२.) विशेष गाडी क्रमांक ०१२४८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ७.१२.२०२२ रोजी (६/७.१२.२०२२ च्या मध्यरात्री) ००.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ०९.०० वाजता सोलापूरला पोहोचेल.

थांबे असे असतील

कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादर.

रचना: १० सामान्य द्वितीय श्रेणी.

(इ) अजनी-मुंबई वन-वे सुपरफास्ट अनारक्षित विशेष (१)

 

१.) सुपरफास्ट स्पेशल ट्रेन क्रमांक ०२०४० अजनी येथून ७.१२.२०२२ रोजी १३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे असे असतील 

वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.

रचना:१६ सामान्य द्वितीय श्रेणी.

टीप : 

मध्य रेल्वेने ६.१२.२०२२ रोजी सुरु होणारी ट्रेन क्रमांक ११४०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-आदिलाबाद एक्सप्रेस प्रवास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, दक्षिण मध्य रेल्वे आदिलाबाद-मुंबई विशेष ट्रेन चालवणार आहे ज्याची सूचना योग्य वेळी केली जाईल. असे मध्य रेल्वे

प्रेस रिलीज केली आहे. 


जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे रद्द झालेल्या खालील गाड्या पूर्ववत


प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वेने जळगाव यार्ड रीमॉडेलिंगमुळे यापूर्वी रद्द केलेल्या खालील गाड्या पूर्ववत केल्या आहेत. तपशील खालीलप्रमाणे आहेत.

रद्द केलेल्या पूर्वता गाड्या १२११२ अमरावती-मुंबई एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२ १२१११ मुंबई-अमरावती एक्सप्रेस JCO ६.१२.२०२२ १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO ४.१२.२०२२ १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस JCO ५.१२.२०२२


याशिवाय विशेष गाडी क्र. ०१२६६ नागपूरहून ५.१२.२०२२ रोजी १५.५० वाजता सुटेल आणि ६.१२.२०२२ रोजी १०.५५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल (सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी)

थांबे असे असतील 

अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळकापूर, जळकापूर, जळगाव, मुर्तिजापूर. चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर)


प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी ही विनंती करण्यात आली आहे. 

--- --- --- --- --- --- --- --- ---

तारीख: 24 नोव्हेंबर 2022

PR क्रमांक २०२२/११/४८

जनसंपर्क विभाग, मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केलेले हे प्रसिद्धीपत्रक

Post a Comment

Previous Post Next Post