शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

संविधान दिना निमित्त कास्ट्राईब कर्मचारी यांच्या वतीने संविधान जागर रॅलीचे आयोजन__


 रणजित दुपरगोडे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


सोलापूर : संविधान दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी संघटनेमार्फत 

मनिष सुरवसे जिल्हाध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्या नेतृत्वात खातेनिहाय संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान जागर रॕली काढाण्यात आली. 

       ही रॅली कलेक्टर आॕफिसच्या आवारातील महासंघाच्या कार्यालया पासून सुरू करून जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यलय, सिद्धेश्वर मंदीर मार्गे आंबेडकर चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संपन्न करण्यात आली.



         यावेळी अरूण क्षिरसागर जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद, जिल्हा सरचिटणीस अरविंद जेठीथोर, कार्याध्यक्ष कल्याण श्रावस्ती, उपाध्यक्ष अनिल धिंमधीमे, विजय माने, वैजनाथ गायकवाड, सहसचिव विजय लोंढे, महेश इंगवले, संघटन सचिव प्रदीप कांबळे, दत्तात्रय रेळेकर, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रसाद सोनवणे, सीव्हील शाखेचे अध्यक्ष सचिन सोनवणे, कोषाघर शाखेचे अध्यक्ष कुलदीप सोनवणे, पाटबंधारे शाखेचे शरण आयवळे, संजय कांबळे, नागनाथ धोत्रे, ज्ञानेश्वर व्हटकर, नरसिंह गायकवाड, चंद्रकांत होळकर, गणेश मस्के, अविनाश गोडसे इत्यादी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post