शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

नाईट ड्युटीवर पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू : अलंकार पोलीस ठाणे


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : पुणे शहरात अलंकार पोलीस ठाण्यात नाईट ड्युटी करत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. 

           योगेश असे मृत्यू झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. अवघ्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.



         योगेश आढारी हे अलंकार पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. काल रात्री ते अलंकार पोलिस चौकीत कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका (Police Constable Passed Away) आला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. आढारी यांच्या पत्नी देखील पोलीस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. योगेश आढारी हे सहा महिन्यापूर्वीच अलंकार पोलीस ठाण्यात आले होते. योगेश आढारी हे सहा महिन्यापूर्वीच अलंकार पोलीस ठाण्यात आले होते. आढारी यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकारी आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post