शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न : ओबीसी महिला आघाडी अध्यक्ष सीमा शेंडे__

सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (ता. हवेली) : हडपसर विधानसभा ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्षा सीमा प्रीतम शेंडे यांच्या वाढदिवसानिमित्त मांजरी ग्रीन सोसायटी येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.

         या आरोग्य शिबीरास विश्वराज हाॅस्पिटलच्या डॉ. आरोग्य अधिकारी, नर्स व मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच शिवराज घुले, माजी उपसरपंच समीर घुले यांच्या उपस्थितीत पार पडला. 

         यावेळी सीमा शेंडे आपल्या मनोगतात असे म्हणाल्या की महिला घर कामामध्ये इतक्या व्यस्त असतात की स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक महिलांनी खास करुन ३५ वयोमर्यादा ओलांडल्या महिलांनी तर वर्षातून अशा तपासण्या करून घ्याव्यात. व स्वताच्या आरोग्याची काळजी घ्यावी. महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्या कुटुंबाची काळजी उत्तम प्रकारे घेऊ शकतात. 

           या शिबीरात प्रामुख्याने रक्त तपासणी, शुगर चाचणी, ब्लड प्रेशर, नेत्र तपासणी, उंची वजन तपासणी, या शिवाय जनरल फिजीशीयन, व हाडांचे तज्ञ डॉक्टर यांनी तपासणी केली. या शिबिरात १२५ नागरिकांनी आरोग्य तपासण्या केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post