प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : अवैध सावकारीचं मजबूत जाळं पोलिसांकडून तोडले जात असून, आणखी एका सावकाराला पोलिसांनी दणका दिला आहे. एक लाखांच्या बदल्यात ६ लाख रुपये वसूल केल्यानंतर आणखी अडीच लाखाच्या मागणीकरून धमक्या देण्यात आल्याचे समोर आले आहे. या सावकाराला पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार गुन्हा दाखल करून नागराज उर्फ नागेश रत्नाकर नायकोडी (वय २४, शनी नगर जांभूळवाडी रोड) या सावकाराला अटक केली आहे.
दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तक्रारदार यांनी आरोपीकडून १५ टक्के व्याजदराने १ लाख रुपये घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी ऑनलाईन आणि फोन पे द्वारे ५ लाख ९५ हजार रुपये दिले होते. तरीही अडीच लाखांची मागणी केली जात होती. त्यांच्या घरात घुसून पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. त्या अनुषंगाने अशा घटना आजूबाजूला घडत असतील तर स्थानिक पोलीस स्टेशनला नागरिकांनी तक्रार दाखल करावी.

Post a Comment