शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे महानगर पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण..


प्रतिनिधी सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (हडपसर) : पुणे महानगरपालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार गेल्या काही दिवसांपासून बिराजदार नगर गोसावी वस्ती मांगवाडा या ठिकाणी स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे. पाणी कमी दाबाने येत आहे. तेही वेळेत नागरिकांना पाण्यासाठी वेळेवर मिळत नाही. 
       प्रोग्रेसिव्ह सोसायटी वैदवाडी येथे काही दिवसांपासून पाण्याची लाईन फुटली असता वंचित बहुजन आघाडी प्रभागाचे अध्यक्ष राकेश पवारळ यांनी दिलेल्या तक्रारीवर गेले दोन दिवसांपासून इथले पाईप लाईन लिकेज वरती काम करण्यात येत आहे. 
         फुटलेल्या पाईप लाईनवर काम करत असलेल्या अधिकारी यांचे म्हणणे असे की पाईपलाईनचे मटेरियल ते खूप जुने असल्याने नवीन मटेरियल बनवण्यासाठी दिलेले आहे. त्यामुळे कामाला दिरंगाई होत आहे. एक ते दोन दिवसांमध्ये  प्रश्न दूर होईल. परंतु जर तुम्ही पाईपलाईन एकदा फोडली तर तो वॉल चालू कशाला करायचा कारण तो वॉल सुरू केल्याने या ठिकाणी हजारो लिटर पाणी हे वाया गेलेले आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
            पुणे महानगरपालिका प्रशासनाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी आहे की जोपर्यंत हा पाण्याच्या पाईपलाईनचा प्रश्न पूर्वरत होऊन पूर्णपणे मिटत नाही तोपर्यंत इथल्या असणाऱ्या स्थानिक वस्ती स्थानिक सोसायटी आणि त्या पाईपलाईन मार्फत जाणाऱ्या सर्व सोसायटी आणि वस्त्यांमध्ये पुणे महानगरपालिकाच्या वतीने टँकर सुविधा देऊन तिथल्या लोकांची होणारी गैरसोय टाळावी तसेच पाण्याचा प्रश्न हा मिटवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
         यावेळी माझ्यासमवेत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे प्रवक्ते श्रीधर जी जाधव तसेच प्रभाग निरीक्षक अभिजीत बनसोडे तसेच प्रभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post