महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : शिक्षण बोर्डात एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये आता दहावी बोर्ड रद्द करून अकरावी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती, मात्र आता ती बदलून बारावी बोर्ड परीक्षा करण्यात येणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शैक्षणिक धोरण आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून लागू होत आहे. पदवी चार वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग अकरावी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे. तर बारावीस्तरावर बोर्ड परीक्षा होणार आहे.
यामध्ये २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिला टप्पा पहिली ते पाचवीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असणार आहे. पूर्वी तो पहिली ते चौथीचा होता. त्याच्यात एक वर्ष वाढवण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्चशिक्षणात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आला आहे. एकविसाव्या शतकातील हे पहिले पाऊल आहे.


Post a Comment