शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

एकपात्री प्रयोग हा मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड : प्रा. विलास आढाव


 सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज

पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील अण्णासाहेब विद्यालयात मराठी रंगभूमीवर अनेक दिग्गज कलाकारांनी एकपात्री नाटकांचे प्रयोग यशस्वी केले.
           एकपात्री नाटकाचे प्रयोग हे अजरामर झाले. प्रयोग मराठी रंगभूमीवरचे मैलाचे दगड म्हणूनही ओळखले गेले आहेत. अभिनय, आवाजाच्या माध्यमातून प्रेक्षकाला खिळवून ठेवणे हे एकपात्री नाटक करणाऱ्या कलाकारासमोरचे सर्वात मोठे आव्हान. आव्हान जो कलाकार पेलतो तो खऱ्या अर्थाने एकपात्री प्रयोग यशस्वी करतो. हे आव्हान लिलया पेलणाऱ्या कलाकाराला आपल्या प्रयोगाची जाहिरात करण्याची गरज भासत नाही. असे प्रतिपादन प्रा.विलास आढाव यांनी केले. 
           याचेच औचित्य साधून देशाचे माजी कृषीमंत्री पद्मभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे गटस्तरीय एकपात्री प्रयोग स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
          एकपात्री प्रयोग , नाटक यांचे आपल्याला संपूर्ण देशभर प्रयोग होताना दिसतात. उत्तम अभिनेता त्याच्या कलेला प्रसिद्धी मिळतो ,लोकप्रिय होतो असे उद्गार एकपात्री प्रयोगाचे उद्घाटन करताना डॉ. आढाव यांनी काढले.  
          याप्रसंगी त्यांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा देत स्पर्धक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकाच व्यक्तीने कोणताही विषय रंगमंचावरून अभिनयासह सादर करणे म्हणजे एकपात्री नाटक होय. प्रत्येक कलाकार आपली एकपात्री कला सादर करतो व नाट्यभूमीला व त्यातील कलाकाराला जिवंत ठेवण्याचे काम करतो. कुठेतरी एकपात्री प्रयोग कमी होत असताना अशा स्पर्धांचे आयोजन होणे गरजेचे आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
           कनिष्ठ महाविद्यालयातून एकूण वीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ शिवकन्या रानुबाई जोधाबाई, सरपंच बाई, स्त्रीची व्यथा, नटसम्राट, शेतकरी, पर्यावरण असा एक ना अनेक विषयावर दर्जेदार अभिनयाचे प्रदर्शन करून  उपस्थितांची मने जिंकली.
         याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल जगताप, उपप्राचार्य खैरे एम .जे, विलास शिंदे,  कैलास देशमुख , ज्येष्ठ शिक्षक भाऊसाहेब भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धक विद्यार्थ्यांना संध्याराणी आटोळे , विशाल शिंदे, वर्षा खळदकर, परदेशी एस.पी यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्याराणी आटोळे तर आभार प्रदर्शन भाऊसाहेब भोसले यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post