शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

गोल्डन सियारा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन__


 विजय सुरवसे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती गोल्डन सियारा पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कलाविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले.

           यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा उपशिक्षणाधिकारी (माध्य) अंकुश शिंदे साहेब विजय इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष विजय चौपाटे सर, संस्थेचे चेअरमन  शैलेश चंद, संस्थेचे व्हाईस चेअरमन  रमेश चंद, खजिनदार अर्जून चंद, संचालक प्राजक्ता यादव, गणेश चंद, दादा चंद, उद्धव जाधव  तसेच मुख्याध्यापिका  प्रीती खणगे मिस आदी मान्यवर उपस्थित होते.



        प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. गणेश वंदना गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन पर नाटिका, गोंधळ, लावणी, विविध नृत्य प्रकार आणि शिवकालीन युद्ध मर्दानीखेळ असे विविध कलागुण सादर केले.

या कार्यक्रमासाठी विद्यार्थी - पालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

         मान्यवरांनी बोलताना शाळेची झालेली प्रगती, विद्यार्थ्यांनी केलेली शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी इत्यादी बाबींचे  तोंड भरून कौतुक केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



      यावेळी मुख्याध्यापिका प्रीती खणगे यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.

यावर्षीचा गुणवंत विद्यार्थी पुरस्कार आदिती वाळुंजकर, विज्ञान डांगर, रूद्र राऊत, दुर्वा सगरे, शन्नू चौहान आणि अनुकल्प शेळके या विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार क्रीडाशिक्षक हेमंत डोईफोडे सर तर आदर्श शिक्षिका सोनिया कांबळे मिस यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप भिसे , प्रियंका चांदणे, शुभांगी पाटील यांनी केले.


         कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सेवकवृंद यांनी कार्यशील सहभाग नोंदवला आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला.



Post a Comment

Previous Post Next Post