शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मांजरीत कोयत्याने दहशत माजवणार्या सराईतांना विविध शहरातून अटक__हडपसर पोलीसांची धाडसी कारवाई__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक (दि 09) रोजी महाराजा बियर शॉपी च्या समोरील रस्त्यावर, मेन गोपाळपटटी चौक, मांजरी ब्रुद्रक या ठिकाणी अनोळखी युवकांनी जमवुन किरकोळ कारणावरून स्थानिक लोंकाना शिवीगाळ करुन दगडाने, बेल्टने मारहाण करुन जखमी करुन मोटारसायकल वरुन पळुन जाताना गाडीला लावलेली कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण केल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १५५४/२०२२ भा. द. वि. कलम - ३०७, ३२४, ५०४, १४३, १४५, १४७, १४९ सह क्रिमीनल लॉ अमेंटमेंट कलम ३ व ७ प्रमाणे, भारतीय हत्यार कायदा कलम - ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

           या गुन्ह्यात यापूर्वी ७ आरोपीना ताब्यात घेतले असून त्यांचेवर यापूर्वीचे कोणतेही गुन्हे दाखल नव्हते मात्र गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील मुख्य सराईत आरोपी पळून गेले होते. मुख्य आरोपी समीर पठाण, शोएब पठाण, गणेश उर्फ दादा हवालदार हे गुन्हा दाखल झालेपासून फरार झाले होते.

          आरोपी हे वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाण बदलत होते. ते गुन्हा दाखल झाल्यापासून भोर, सांगली, कोल्हापूर, बारामती असे वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असलेबाबत माहीती प्राप्त होत होती. 

             आरोपी गणेश उर्फ दादा हवालदार हा कामठघर, भिवंडी जिल्हा ठाणे येथे असल्याबाबत तांत्रिक माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी तपासपथाकाचे पोलीस अंमलदार समीर पांडुळे, निखील पवार, प्रशांत दुधाळ यांची तपास टिम जावून आरोपी गणेश ऊर्फ दादा हवालदार यास (दि.23) रोजी पहाटेच्या वेळेस ताब्यात घेतले. 

           तसेच पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर यांच्या तपास टिमने दातरंगे मळा, नालेगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी कारवाई करत असताना आरोपीने तपास टिमला पाहून पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून आरोपी समिर पठाण व शोएब पठाण यांना (दि.23) रोजी सकाळी ताब्यात घेतले. 

           हडपसर पोलीसांनी केलेल्या तपासात एकाच दिवशी भिवंडी ठाणे व नालेगाव, अहमदनगर या भागात कारवाई करून समिर लियाकत पठाण (वय २६) वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे, शोएब लियाकत पठाण (वय २२) वर्ष रा. गोपाळपट्टी मांजरी पुणे, गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार (वय २२) वर्ष रा. महादेवनगर हडपसर पुणे यांना अटक केली. 



          वरील ३ अटक आरोपी यांचे हडपसर परिसरात मागील ७ वर्षापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हडपसर पोलीसांनी या गुन्ह्रामध्ये एकुण १० आरोपी यांना अटक केली आहे.

           हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशिल लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार, प्रशात दुधाळ, प्रशांत टोणपे, अतुल पंधरकर, सचिन गोरखे, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे,  यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post