शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

आदिवासी दुर्गम भागात नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबीर संपन्न__


 प्रतिनिधी-भाऊ वैजल

  महाराष्ट्र पोलीस न्यूज


पालघर (ता. मोखाडा) : जतन फाउंडेशन फॉर इन्कलुशीन व विहंग शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व तरुण मित्रमंडळ पुलाचीवाडी यांच्या आयोजनाने मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, शिबीर मोखाडा तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील पुलाचीवाडी येथे आयोजित करण्यात आले होते.

          ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे शिबीर या संस्थामार्फत आयोजित करण्यात आले होते. या नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिरात अनेक गरजूनी सहभाग नोंदवला. ज्यांचे वय ३० पेक्षा जास्त आहे व डोळ्यांचे नाजूक इंद्रिये खराब होऊ नये या कारणाने लोकांनी या संधीचा लाभ घेतला.

         या वेळी या संस्थाचे सर्व स्टाफ व आयोजक नितीन साळवे (अध्यक्ष-संगणक परिचालक संघटना मोखाडा तालुका)

गोपीनाथ धोडी, ईश्वर कुरबुडे, सुनील कुरबुडे, संजय मोहंडकर हे ग्रामस्थ उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post