सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस
पुणे (ता. हवेली) : कदमवाकवस्ती येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थींची कराटे मध्ये गोल्ड मेडलची कमाई
२ डिसेंबर २०२२ रोजी तळकटोरा इनडोअर स्टेडियम नवी दिल्ली येथे पार पडल्या. ऑल इंडिया इंटर झोन कराटे चॅम्पियनशिप मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत नंदिनी चव्हाण हिने सुवर्णपदकाची कमाई केली. ही खेळाडू गुजरात येथे झालेल्या वेस्ट झोन मधून निवड झाली होती. वेस्ट झोनचे प्रतिनिधित्व करत तिने महाराष्ट्राकरिता सुवर्ण पदक मिळवले त्याचप्रमाणे या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत दिव्या चव्हाण आणि वैष्णवी सोलापुरे या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या सर्व खेळाडूंचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे. हे सर्व खेळाडू चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे -डो असोसिएशनचे अध्यक्ष कराटे मुख्य प्रशिक्षक - सेन्साई हेमंत डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे प्रशिक्षण घेत आहेत. या खेळाडू गोल्डन सियारा पब्लिक स्कूल या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत. या सर्व खेळाडूंचे स्वागत स्कूल कमिटी चेअरमन शैलेश चंद, प्रिन्सिपल प्रीती खणगे, मिस सर्व शिक्षक, सेवकवृंद, विद्यार्थी पालक यांनी केले.


Post a Comment