शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचा विकास व उन्नतीसाठी जनसेवा पॅनेलला विजयी करा__ जनसेवा पॅनल प्रमुख नंदूपाटिल काळभोर__


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) :  कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील जनसेवा पॅनेलचे प्रमुख नंदूपाटिल काळभोर यांनी सांगता सभेच्या पुर्वी निवेदनात असे म्हणाले 

         

          माझ्या प्रिय मतदार बंधू भगिनी व माझ्यासाठी सतत कार्यतत्पर असणाऱ्या माझ्या तरुण मित्रांनो, आपल्या कदम- वाकवस्ती ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. जनसेवा पॅनलचे सरपंच पदाचेउमेदवार कल्पना बाबासाहेब काळभोर ह्या आहेत. याच बरोबर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत मधील जनसेवा पॅनेलचे सर्व च्या सर्व उमेदवार यांना विकासासाठी निवडून द्यावे. 

        मित्रांनो आपलं, आपला परिवार आणि गावाचं पाच वर्षाचं भविष्य, मतदानाचा दिवस ठरवत असतो, म्हणून या दिवशी दक्ष राहणं फार फार महत्वाचं असतं कारण एकदा - केलेल्या चूकीचं पुढे पाच वर्ष फळ भोगावं लागतं, जे आपण सध्या पाहत, भोगत आहोतच. 

          गावचा विकास व्हावा आणि उन्नती होत रहावी, या उद्देशाने आपण एकत्र येऊन येत्या दि. १८ तारखेला मतदानाचा हक्क बजावणार आहात. 

            या आधीची २० वर्ष आपण सर्वांनी मला खूप आशीर्वाद, शुभेच्छा व पाठबळ देऊन प्रमाणिक समाजसेवेची संधी दिली. तुमच्या सहकार्यानेच आपण त्या काळात केलेल्या कामाचे तुम्ही सर्व साक्षीदार आहात. मागील पाच वर्षापूर्वी एक बदल म्हणून तुम्ही विरोधकांच्या बाजूने कौल दिला, तो मी मोठ्या मनाने स्वीकारला पण त्यानंतर पाच वर्ष सत्ताधाऱ्यांकडून विकासाच्या नावावर काय मनमानी कारभार सुरु होता ते आपण पाहतच आहात. पाच वर्षापूर्वी तुम्ही दिलेल्या संधीचं सत्ताधार्यांना गावाच्या विकासात रूपांतर करता आले नाही. हे आज तुमच्याही लक्षात येत आहेच. असो.......

          मागे पाच वर्षापासून मी सत्तेत नसलो तरी गावासाठी ग्रामस्थांसाठी जी-जी मदत, सहकार्य करता येईल जे-जे योगदान देता येईल ते मी देत आलो आहे, हे माझं गावाप्रती कर्तव्यच आहे हे मी समजतो. मतदारांनो, आपल्या वैयक्तिक सुख दुःखात मी आपल्या कुटुंबाचा एक घटक म्हणून सहभागी होत आलो आहे. आणि कायम होत राहणार आहे, कारण संबंध गाव मी माझं कुटुंबच समजतो. म्हणून गावचा सर्वांगिण विकास हाच माझा ध्यास व स्वप्न आहे. त्यासाठी राजकारणात निवडणूकीच्या माध्यमातून मला आपल्या पाठिंब्याचा फार मोठा आधार वाटतो. कारण हे तुमच्या शिवाय शक्य नाही. ग्रामस्थांनो सत्तेने विकासाचं बळ मिळतं आणि गावाच्या उन्नतीत हातभार लागतो. म्हणून येणाऱ्या काळात आपणा सर्वांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करत राहणार आहे. त्यासाठी तुमची समर्थ साथ हवी आहे. पाच वर्ष थांबलेला विकासाचा रथ गतीमान करण्यासाठी व विकास कामांची गंगा आपल्या भागात खळखळत वाहत ठेवण्यासाठी, मी जनसेवा पॅनेलच्या माध्यमातून प्रत्येक वार्डात सक्षम उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. आपणा सर्वांच्या प्रेमाची, शुभेच्छांची व चूक सुधारून अचूक निर्णय घेण्याच्या शक्तीची मला खात्री आहेच.

Post a Comment

Previous Post Next Post