सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता. हवेली) : मतदारांनी मोठ्या विश्वासाने सत्ता दिली असतांना, मागील पाच वर्षाच्या काळात सत्ताधारी पॅनलचे प्रमुख चित्तरंजन गायकवाड व विद्यमान सरपंच गौरी गायकवाड या दोघांनी मागील पाच वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. अशा भ्रष्टाचारी लोकांना सत्तेतून हद्दपार करण्यासाठी व ग्रामपंचायतचा सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी जनसेवा पॅनललाच निवडून द्यावे. असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व “ जनसेवा पॅनेलचे प्रमुख नंदु काळभोर यांनी व्यक्त केला आहे.
लोणी स्टेशन येथे जनसेवा पॅनेलच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी (ता. १६) पार पडली. यावेळी बोलताना नंदु काळभोर यांनी वरील आवाहन केले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधवराव काळभोर होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, साधना सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक सुभाष काळभोर, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर यांच्यासह अरुण काळभोर, सुभाष कदम, बाबासाहेब काळभोर, सुनील कदम, बाळासाहेब कदम, ऋषिकेश काळभोर, देविदास कदम, प्रितम काळभोर, निलेश काळभोर, सचिन काळभोर, पांडा काळभोर, बाळासाहेब गायकवाड, शरीफमामु खान, सुरेश गायकवाड, राजाराम दळवी, योगेश घुले, विजय थोरात, शेखर काळभोर, सुरेश चांदणे, जयसिंग घाडगे, दिलीप दोडके, सुशील काळभोर, अश्वित काळभोर, विलास कदम, प्रदीप गुजर, जयशिंग चंद, दादा चिंतामण घाडगे, पांडुरंग कदम, संजय चांदणे, नितीन टिळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नंदू काळभोर म्हणाले, सत्ताधारी मागील पाच वर्षात सव्वाशे कोटींची विविध कामे केल्याचा ढोल वाजवीत आहेत. मात्र झालेली बहुतांश कामे आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद, पंचायत समिती व आमच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून झाली आहेत. मात्र "खोटे बोल पण रेटून बोल” या स्वभावानुसार चित्तरंजन गायकवाड ही कामे आम्हीच केली म्हणत आहेत. सव्वाशे कोटींची विकास कामे केली असे सांगत असतानांच, त्यांनी केलेला भ्रष्टाचार जनतेसमोर येऊ लागल्याने, त्यांना निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे.
आमचे निवडणुकीत उतरलेले सर्व उमेदवार पाहता आमचा विजय निश्चित आहे. मतदार राज्या भ्रष्ट प्रवृत्तीला साथ देणार नसल्याने जनसेवा पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार कल्पना काळभोर यांच्यासह सर्व १७ उमेदवार उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असला विश्वासही नंदु काळभोर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी युवा नेते प्रतिक काळभोर म्हणाले,
मागील पाच वर्षात विकासाच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे. कोविडच्या काळात कित्येक लाखांचा भ्रष्टाचार झालेला आहे. पाणीपुरवठा योजना मंजुर कोणी केली व त्याचे ढोल कोण वाजवते हे न कळण्या इतके मतदार भोळा-भाबडा नाही. आमदार अशोक पवार, विद्यमान उपसरपंच बाबासाहेब काळभोर, माजी उपसरपंच ऋषी काळभोर आदींनी पाणीपुरवठा योजना मंजुर करण्यासाठी प्रयत्न केले होते. ग्रामपंचायतीचा विकास व ग्रामपंचायत कार्यालयात येणाऱ्या नागरीकांना सन्मान यासाठी आम्ही कटीबध्द असुन, जनतेने आपल्या अंतरमनाचा कौल घेऊन आमच्या पॅनेलला निवडुन द्यावे असे आवाहनही प्रतीक काळभोर यांनी यावेळी केले.
या सभेत पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रविण काळभोर, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा स्मिता नॉर्टन, माजी , उपसरपंच ऋषिकेश काळभोर, साधना सहकारी बँकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, जेष्ठ नेते गणपत चावट, दत्ता आंबुरे, प्रतिक काळभोर यांनी भाषणे केली. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेश काळभोर यांनी केले.

Post a Comment