सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : पुणे शहराची लोकसंख्येच्या दृष्टीने वाढ होत आहे. वाढ होत असताना सुवीधासह इतर ही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
त्याच अनुशंगाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वच्छता अभियान व पुुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेऊन ३४ गावांसाठी स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करण्यात यावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
पुर्व हवेलीतील ३४ गावांची स्वतंत्र महानगरपालिका स्थापन करावी या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेत असताना पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या बरोबर दौंडचे आमदार राहुल कुल उपस्थित होते.
फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळून तेथे नगरपालिका करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला आहे. या गावांच्या नगरपालिका निर्णयाने पुर्व हवेलीतील उर्वरित समाविष्ट गावांनी हडपसर महानगरपालिका करावी या मागणीने जोर धरला आहे. या संदर्भात राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे ही मागणी केली आहे.
निवेदन दिल्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला सकारात्मकता दाखविली असल्याचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले. ऑक्टोंबर २०१७ ला अकरा गावांचा व जून २०२१ ला उर्वरित तेवीस गावांचा पुणे महापालिकेत समावेश उर्वरित तेवीस गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता.
या समाविष्ट गावातुन अवाजवी कर आकारून महापालिकेने करोडो रुपये जमा केले असुन त्या बदल्यात महापालिका नागरी सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली आहे. या कारणास्तव सतत या भागातील लोकांचा महापालिकेसोबत वादविवाद, संघर्ष होताना पहावयास मिळत असुन मोठ्या प्रमाणात उदासीनता, नाराजी दिसत आहे. फुरसुंगी व उरुळी देवाची ही गावे महापालिकेतून वगळून तेथे स्वतंत्र नगरपालिका होणार असल्याने, उर्वरित तेवीस गावांनीही आम्हाला महापालिकेतून वगळून आमची स्वतंत्र महापालिका स्थापन करावी या मागणीने जोर धरला आहे. अनेक गावात यासाठी ग्रामसभाही झाल्या आहेत. "लोकसंख्या व क्षेत्रफळाचा विचार करता राज्यातील सर्वात मोठी मनपा झाली आहे. तुलनेत सदस्य संख्या खूपच कमी आहे. पुणे पालिकेवर वाढता ताण पाहता पूर्व भागाची नवीन महापालिका करण्यात यावी याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
त्यांनी ही याविषयी अधिक माहिती घेवून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे सांगून या विषयाला सकारात्मकता दाखविली आहे.

Post a Comment