सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज शुक्रवारी (ता. ३०) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. हिराबेन यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांना ही महिती मिळताच आपल्या मनोगतात_ भारत देशाचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी अनंतात विलीन झाल्याची बातमी अत्यंत दुःख देणारी आहे. अत्यंत साधे आयुष्य जगून भारतमातेच्या सेवेकरिता ओजस्वी पुत्र घडविणाऱ्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. असे म्हणाले


Post a Comment