शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 21 वाहनांचा जाहीर ई-लिलाव नाव नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा__


                                           संग्रहीत फोटो


शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या २१ वाहनांचा जाहीर ई-लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.



           उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात २ ते १५ फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहीर ई-लिलावात बस, एचजीव्ही, एमजीव्ही, एलजीव्ही, पीक अप, टुरिस्ट टॅक्सी व रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सूचनाफलकांवर माहितीसाठी लावण्यात आली आहे.

           जाहीर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी २ ते १० फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत https://eauction.gov.in/eauction/#/ या संकेतस्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.

           ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर २  ते १३ फेब्रुवारीपर्यंत या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १० ते सायंकाळी ६ प्रत्येक वाहनासाठी ५० हजार रुपये अनामत रकमेचा धनाकर्ष 'डीवाय आरटीओ पिंपरी चिंचवड' या नावे सादर करावा. सोबत ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी व मंजुरीसाठी सादर करणे गरजेचे आहे.

         लिलावाचे अटी व नियम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथील सूचना फलकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असतील. ही वाहने 'जशी आहेत तशी' या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील, असे कराधान प्राधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळवले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post