शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार येथे ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन__


                                     संग्रहीत फोटो


शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्यूज


 पुणे : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार पुणे येथे २० व २१ जानेवारी आणि २३ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

            या प्रदर्शनामध्ये ऐतिहासिक सांस्कृतिक ठेवा असलेले अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ, महापुरुषांचे चरित्र्य व लेखनसाहित्य, शासनाची अधिकृत इतर प्रकाशने १० टक्के सवलतीच्या दरात विक्री करण्यात येणार आहेत.

            नागरिकांनी या ग्रंथप्रदर्शनास भेट देऊन ग्रंथ खरेदी करण्याचे आवाहन मुद्रणालयाचे व्यवस्थापक स. ह. केदार यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post