सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (ता.हवेली) : पुर्व हवेलीतील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणुकीत “सरपंच" म्हणुन नुकतेच जनतेतुन मोठ्या मत्ताधिक्क्याने निवडुन आलेले चित्तरंजन गायकवाड यांनी कदमवाकवस्तीच्या मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांच्याकडुन सोमवारी (ता. 2) सकाळी अकरा वाजता चित्तरंजन गायकवाड यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला.
पदाचा पदभार स्विकारल्या नंतर चित्तरंजन गायकवाड यांनी त्याच्याच अध्यक्षतेखाली व अधिकारी हवेलीचे नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत निवडणुकीत पार पडलेल्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या पहिल्याच बैठकीत, कदमवाकवस्तीच्या उपसरपंचपदी “राजश्री उदय काळभोर” यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी केली.
सतरा सदस्यांच्या ग्रामपंचायतीत उपसरपंच पदासाठी राजश्री काळभोर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी हवेलीचे नायब तहसीलदार संजय भोसले व सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी उपसरपंचपदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
कदमवाकवस्तीचे सरपंच म्हणुन चित्तरंजन गायकवाड यांनी पदभार स्विकारल्याचे तर उपसरपंचपदी राजश्री काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामस्थांना समजताच, ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमलेल्या शेकडो ग्रामस्थ व चित्तरंजन गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाके व गुलालाची उधळून करीत जल्लोष करण्यात आला. यावेळी मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांनी नवनिर्वाचीत सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचा सत्कार केला. तर नवनिर्वाचीत उपसरपंच राजश्री काळभोर व नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सभागृहात माजी सरपंच गौरी गायकवाड, नवनिर्वाचित सदस्य आकाश काळभोर, सिमिता लोंढे, कोमल काळभोर, बिना काळभोर, मंदाकिनी नामुगडे, दीपक अढाळे, सुनंदा काळभोर, नासीरखान पठाण, रुपाली काळभोर, स्वप्नील कदम, अविनाश बडदे, सोनाबाई शिंदे, योगेश मिसाळ, सलीमा पठाण, राणी गायकवाड, गुरुनाथ जाधव, प्रितम गायकवाड, मुकुंद काळभोर, अभिजित बडदे, राहुल काळभोर, तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम, व माजी सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना "सरपंच चित्तरंजन गायकवाड" म्हणाले_
"कदमवाकवस्तीच्या मावळत्या सरपंच गौरी गायकवाड यांच्या काळात नव्वद कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेसह मागील पाच वर्षात झालेली सव्वाशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांच्या जोरावर कदमवाकवस्तीच्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने आमच्या हाती सत्ता दिली आहे. ही सत्ता देणारे मतदार, आमचे कार्यकर्ते व नागरीकांचे आम्ही ऋणी आहोत. पुढील पाच वर्षाच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत राज्यात अग्रेसर कशी राहिल याकडे लक्ष दिले जाईल."
यावेळी बोलतांना नवनिर्वाचित "उपसरपंच राजश्री काळभोर" म्हणाल्या_
“कदमवाकवस्ती गावचे सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन एका महिलेला प्रथम उपसरपंच पदाची संधी दिली आहे. यामुळे आगामी काळात सरपंच व सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून सर्वाना बरोबर घेऊन अत्यावश्यक असलेली सर्व कामे मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देणार आहे."



Post a Comment