शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

तलाठी व कोतवाल यांच्यावर लाच मागणीचा गुन्हा दाखल__लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई___


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे : तलाठी व कोतवाल यांचेवर लाच मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई लाच घेताना रंगेहात पकडले. पौड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गु.र.नं. ४७ / २०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम - ७, १२. नुसार आरोपी लोकसेवकांचे नाव व १) संजय बाबुराव दाते, तलाठी, उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे २) अमित भंडलकर (कोतवाल) उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे. यांच्यावर प्रथम २,००० रु. व तडजोडी अंती ९४२/- (नऊशे बेचाळीस रूपये) घेताना रंगेहात पकडले

           यामध्ये पडताळणी दिनांक :- ३०/१२/२०२२, दि. ०२/०१/२०२३ गुन्हा दाखल दिनांक :- २७/०१/२०२३ या रोजी करण्यात आला


थोडक्यात माहिती : 


           यातील तक्रारदार यांचे माहिती अधिकारातील कागदपत्र विनाशुल्क देण्याबाबत राज्य माहिती आयोगाचा आदेश असताना, लोकसेवक संजय दाते, तलाठी उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे यांनी सदरची माहिती देणेकरीता २,०००/- रुपये लाच मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता तक्रारदार यांचेकडे लोकसेवक क्र. १ दाते यांनी माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी ९४२/- रुपये लाचेची मागणी केली. त्या लाच मागणीस कोतवाल भंडलकर यांनी सहाय्य केले म्हणून दोघांवर वरील प्रमाणे लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला 

         त्यामध्ये क्रमांक १ तलाठी दाते यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ला.प्र.वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार तपास करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त / पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

          शासकीय अधिकारी, कर्मचारी / लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post