शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कोलवडी - साष्टे : ग्रामपंचायत व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रशिक्षण शिबिरातील महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. _


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : मांजरी खुर्द, कोलवडी-साष्टे ग्रामपंचायत व सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने महिला ग्रामस्थांना "शिलाई मशीन व डिझाईनिंग' हे मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. दीड महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या महिलांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.



           सरपंच सुरेखा गायकवाड, उपसरपंच राजाराम भालसिंग, सदस्य संजय रिकामे, पूनम पवार, लता शिर्के, दिलीप उंद्रे, जयसिंग उंद्रे, ग्रामविकास अधिकारी अनील कुंभार, प्रशिक्षक आशा गरूड यांच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

            सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून  व्यवसाय प्रशिक्षण योजने अंतर्गत गावातील महिलांना शिलाई मशीन चालविणे व ब्लाऊज, ड्रेस डिझाईनिंग प्रशिक्षण देण्यात आले आहे. कोलवडी-साष्टे ग्रामपंचायतच्या वतीने व सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेकडून हे प्रशिक्षण देण्यात आले. दीड महिना चाललेल्या या प्रशिक्षण काळात महिलांनी शिलाई मशीन चालविण्यापासून ब्लाऊज व ड्रेसचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतले. 

           उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी म्हणून रूपाली गायकवाड, राणी गायकवाड व सुवर्णा गायकवाड यांना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणार्थी सविता थिटे यांनी यावेळी प्रशिक्षणाबाबत आपले अनुभव व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "मिळालेले प्रशिक्षण सखोल आहे. त्यामुळे आम्ही स्वतःच्या घरातील महिलांची कपडे शिवू शकतो. त्यासाठी बाहेर होणाऱ्या खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे. याशिवाय या शिवणकलेला  व्यवसायीक स्वरूप दिल्यास चांगले उत्पन्नही मिळू शकते. आम्हाला त्यामुळे रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे.'

          ग्रामविकास अधिकारी कुंभार म्हणाले, "सरकारने अशा रोजगार प्रशिक्षणांद्वारे महिलांना चांगली संधी निर्माण करून दिली आहे. शिलाई मशीन व डिझाईनिंग मधील प्रावीण्य मिळवून या सर्व महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करावा.

         सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकांत कोबल यांनी संयोजन केले. तर, उपसरपंच राजाराम भालसिंग यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post