शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चौघांना बेड्या तर त्यांच्याकडून २ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त..! रानवडी येथील खुनाचे गुढ उकलण्यात वेल्हे पोलीसांना यश_


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. वेल्हे) :  शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन विट, लोखंडी अँगल, लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. रानवाडी ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या खुनाचे गूढ उकलण्यात वेल्हे पोलिसांना यश आले असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.


(विजय प्रफुल्ल काळोखे (वय - ३८, रा. कन्या शाळेशेजारी, विजय लॉज बिल्डींगचेवर, आप्पा बळवंत चौक पुणे-३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.) 


           नितीन रामभाऊ निवंगुणे (वय - ५४), विजय दत्तात्रय निवंगुणे (रा. दोघेही आंबी, ता. हवेली) ओंकार नितीन निवंगुणे, पांडुरंग रामभाऊ निवगणे, वय ४९, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हे पोलीस ठाण्याच्या रानवडी ग्रामपंचायत हद्दीत १३ ते १८ जानेवारी दरम्यान नितीन निवंगुणे यांच्या पत्र्याच्या कंपाउंडमध्ये नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी संगनमत करताना विजय काळोखेची हत्या केली होती. यासाठी त्यांनी वीट, लोखंडी अँगल, रॉड यांच्या साहाय्याने हत्या केली होती. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देश्याने मृतदेह आरोपीच्या शेतात पुरून ठेवला आहे, अशी तक्रार पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांनी पोलिसांना दिली होती.


(गुन्हा गंबीर असल्याने वेल्हे पोलिसांनी तपासाला सुरुवात) 


       तपासा दरम्यान मयत विजय काळोखे घरातून बाहेर जाताना सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन गेला असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे नितीन निवंगुणे याला तपासकमी बोलावले असता, मयत विजय हा दागिने आणि पैसे घेऊन गेला असल्याचे विजयाच्याच नातेवाईकांकडून समजल्याचे नितीन याने सांगितले. तसेच सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम पाहून लोभ व हव्यासापोटी त्याने संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमट्याने विजय काळोखे याचे डोक्यात तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खुन केला व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याचे प्रेत प्लास्टीकच्या बॅरलमध्ये टाकले. सदरचे प्रेत असलेला प्लास्टीकचा बैलर उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून रानवडी येथील आरोपी नितीन निवंगुणे याचे जमिनीत आरोपी विजय निवंगुणे याचे सहायाने खड्डयात पुरले असल्याची माहिती पोलिसांना दिली.

            दरम्यान, गुन्हयाचे पुढील तपासात तालुका कार्यकारी दंडाधिकारी सी. वेल्हे यानी सी.आर.पी.सी. १७६ प्रमाणे कार्यवाही केली असता मयत विजय यांचा मृतदेह सापडला आहे. सदर मृतदेहाची पाहणी करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी ओंकार निवंगुणे याच्याकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी गाडीसह १ कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करत आहेत.

        ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागिय पोलीस अधिक्षक भाउसाहेब ढोले पाटील, हवेली यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उप निरीक्षक महेश कदम व पथकातील अंमलदार सुदाम बादल, योगेश जाधव, पोहवा रविंद्र नागटिळक. पंकज मोघे, ज्ञानदिप धिवार, अजयकुमार शिंदे, कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post