सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. रितेश कुमार व सह आयुक्त पुणे शहर मा.संदीप कर्णिक यांनी पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुदध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दशहत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले.
त्या अनुषंगाने (दि. ०४) रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील पो शि वीर यांना गोपनिय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, रामदरा रोड, बल्लाळवस्ती ता.हवेली जिल्हा पुणे. येथे गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी हातभट्टीचे रसायन व साहित्यासह गावठी दारु बनवत असल्याची माहिती मिळाली
ही माहिती मा. वरीष्ठ पोलीस निरीक्ष दत्तात्रय चव्हाण यांना देऊन त्यांनी पो.उपनि गोर व तपास पथक स्टाफ यांना सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्याप्रमाणे नमुद पथकाने ११/१५ वा. चे सुमारास रामदरा रोड बल्लाळवस्ती ता. हवेली जिल्हा पुणे येथे छापा टाकला असता सदर ठिकाणी एका मोठया पत्र्याचे भांडयामध्ये गुळ, तुरटी व पाणी यांचे अंदाजे एक हजार लिटर रसायन व साहीत्यानिशी गावठी दारु बनवित असताना (१) शेखर मधुकर काळभोर वय ४५ वर्षे धंदा हातभट्टी व्यवसाय रा. बल्लाळवस्ती, रामदरारोड लोणीकाळभोर ता हवेली जि पुणे (२) रामकुमार जयप्रसाद लोधी वय २४ वर्षे धंदा मजुरी रा. रामदरा रोड, बल्लाळवस्ती लोणीकाळभोर पुणे मुळ रा हिडोलनी पोस्ट बनभरीया तहसील अमेठी जिला सुरतानपुर राज्य उत्तरप्रदेश हे मिळुन आले.
या ठिकाणी असलेल्या रसायन व साहीत्याची पाहणी केली असता त्या ठिकाणी (१) १०,००० /- रु. किंमतीची एका मोठया पत्र्याचे भांडयात एक हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे पक्के रसायन. किं. अं. प्रती लि. १० रु. याप्रमाणे. (२) १,०००/- एक पत्र्याचे भांडे १००० लि. मापाचे जु.वा. किं.अं. असा एकुण ११,०००/- किंमतीचा माल मिळुन आला असुन नमुद मालापैकी आवश्यक तेवढे सॅम्पल करीता नमुना घेण्यात आल्यानंतर उर्वरीत माल जाग्यावर नष्ट करण्यात आला.
(उल्लेखनीय कामगीरी)
मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ - ५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पोना जाधव, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment