शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"परभणीत झाला खुन__ बातमीदाराच्या सतर्कतेमुळे__ आरोपी लोणीकाळभोर पोलीसांच्या जाळ्यात"


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्यूज


पुणे (ता. हवेली) : लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथकातील पो. हवा नितीन गायकवाड व पो. शि. शैलेश कुदळे यांना त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, “तिन इसम हे लोणी रेल्वे स्टेशन या ठिकाणी वसले असुन त्यांच्या मध्ये खुना बाबत चर्चा सुरु आहे. त्यांच्या बोलण्यावरुन ते त्यांच्या मित्राचा खुन करुन आलेले आहेत. त्याच्या पैकी एकाचे डोक्यावर लाल टोपी आहे" वगैरे माहीती मिळाल्याने त्यांनी माहिती पोउपनि गोरे यांना कळवली

          पो.उपनि गोरे यांनी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण साो. यांना माहीती सांगितली. 

          त्या अनुषंगाने पो. उपनि गोरे व तपास पथकातील स्टाफ असे लोणी रेल्वे स्टेशन येथे वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचुन थांबले असता रेल्वे लाइन जवळ तीन इसम हे एकमेकांसोबत चर्चा करत बसले होते. पो. उपनि गोरे व स्टाफ त्यांच्या जवळ गेले असता तीन इसम यांना संशय आल्याने ते इसम तेथुन पळु लागले, त्यावेळी तपास पथकातील स्टाफने त्यांचा पाठलाग करुन तिन्ही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले. 



              लोणी काळभोर पोलीस स्टेशन तपास पथक या ठिकाणी आणुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव (१) आदित्य इस्माईल शेख (२) मोहम्मद मुजाइद सिद्धीकी (३) नयुम चाँद शेख सर्व रा. मु पो करंजी ता. वस्मत जि हिंगोली असे असल्याचे सांगीतले. 

        पो. उपनि गोरे व स्टाफ यांनी त्या तीन इसमांना विश्वसात घेवुन 'तुम्ही कोणाच्या खुना बद्दल चर्चा करत बसले होता' असे सांगुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगीतले की, “त्यांनी त्यांच्या गावातील त्यांचा मित्र (नाव - शाहरुख शुभम शेख) याचे सोबत असलेल्या जुन्या भांडणावरुन त्याला दि. २९/१२/२०२२ रोजी रात्री अंदाजे ११/३० वा चे सुमारास नांदगाव ब्रिजजवळ बोलावुन त्यास दारु पाजुन त्याच्या मोटारसायकलला असलेल्या दोरीच्या सह्याने त्याचा गळा आवळुन खुन केला आहे. तसेच त्याची होंडा शाईन मोटारसायकल व शाहरुख याचे अंगावरील कपडे नांदगाव ब्रिज पासुन पाच ते सात किलो मीटर पुढे एका छोट्या ब्रिजचे पाईपखाली जाळून नष्ट केले आहेत. अशी माहिती सांगीतली. 

          त्यानंतर पो. उपनि गोरे यांनी तात्काळ परभणी पोलीसांशी संपर्क करुन (शाहरुख शुभम शेख रा.मु पो करंजी, ता वसमत जि. परभणी) याचे बाबत चौकशी केली असता आम्हाला खात्रीशीर माहीती मिळाली.

         अशी की "पुर्णा पोलीस स्टेशन जिल्हा परभणी या ठिकाणी गु र नं ०२ / २०२३ भादवि कलम ३०२,२०१ अन्वये इसम नामे शाहरुख शुभम शेख रा.मु पो करंजी, ता वसमत जि परभणी याचा खुन करुन पुरावा नष्ट केले बाबत अज्ञात आरोपीतां विरोधामध्ये गुन्हा दाखल आहे”. आम्ही तात्काळ पुर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री मारकड यांना सदर बाबत माहीती देवुन आरोपी नामे (१) आदित्य इस्माईल शेख (२) मोहम्मद मुजाइद सिद्धीकी (३) नयुम चाँद शेख सर्व रा. मु पो करंजी ता. वस्मत जि हिंगोली यांना पुढील कायदेशीर कारवाई कामी पुर्णा पोलीसांच्या ताब्यात दिले.

           सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. संदीप कर्णीक पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. विक्रांत देशमुख पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ५, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, दत्तात्रय चव्हाण वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे पोलीस निरीक्षक (गुन्हे) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदशनाखाली पो. उपनि अमित गोरे, पो. हवा गायकवाड, पोहवा पाटोळे, पोना नागलोत, पोना जाधव, पोना देवीकर, पोशि पुंडे, पोशि वीर, पोशि कुदळे, पोशि पवार, पोशि सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post