सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे : पुणे महानगरपालिका झोन क्र. २ येथील आंबेगाव बु. येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊन ८१५० चौ. फुट. क्षेत्र मोकळे करण्यात आले.
आंबेगाव बु. स.न. ४० पार्ट येथील विना परवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ५२(१)(अ) आणि कलम ५३ (१) (अ) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत येऊन सुमारे ८१५० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
सदर कारवाईमध्ये स.नं. ४० पार्ट दत्तनगर चौक, आंबेगाव बु. येथील पवन व्हरायटीज यांचे ६०० चौ. फुट, शतानंद बार अॅण्ड रेस्टॉरन्ट यांचे १५०० चौ. फुट, आयुष आंबेवाल यांचे ६०० चौ. फुट, नृसिंहवाडी बासुंदी यांचे १५० चौ. फुट, भैरवनाथ भेळ यांचे २०० चौ. फुट, गॅलक्सी पान शॉप यांचे १०० चौ. फुट, दत्तकृपा रसवंती गृह यांचे ५०० चौ. फुट, श्री समर्थ रसवंती गृह यांचे २०० चौ. फुट, आईसाहेब अमृततुल्य यांचे १५० चौ. फुट, सुरज स्क्रॅप सेंटर यांचे २५० चौ. फुट, लक्ष्मीप्रसाद फुट वेअर यांचे १५० चौ. फुट, महावीर कलेक्शन यांचे १०० चौ. फुट, श्री माजीसा किचन फर्निचर यांचे १५० चौ. फुट, एक्साईड बॅटरी केअर यांचे २०० चौ. फुट, श्रीयान सर्व्हिस सेंटर यांचे २५० चौ. फुट, यशराज कॉम्प्युटर्स यांचे १५० चौ. फुट, रोहिणी कलेक्शन यांचे २५० चौ. फुट, लेटेस्ट आर्ट गॅलरी यांचे २०० चौ. फुट, सुमित गायकवाड लिगल सर्व्हिस यांचे १५० चौ. फुट, भाग्यश्री कलेक्शन यंचे २०० चौ. फुट, अमृता पुष्पालय अॅण्ड बुके यांचे २५० चौ. फुट, अमृता सुगंधालय यांचे २५० चौ. फुट, स्नेहा कारपेट्स अॅण्ड वॉलपेपर यांचे २०० चौ. फुट, रामदेव मोबाईल शॉप यांचे २०० चौ. फुट, प्रितम पान शॉप यांचे १०० चौ. फुट, कानिफनाथ रसवंती गृह यांचे २५० चौ. फुट, जयशंकर पान शॉप यांचे १५० चौ. फुट, • फ्रेश ज्युस सेंटर यांचे २०० चौं. फुट, श्रीराम अमृततुल्य यांचे १५० चौ. फुट, चॉईस पान शॉप यांचे १५० चौ. फुट, ओम साई स्नॅक्स सेंटर यांचे २०० चौ. फुट असे एकूण ८१५० चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
सदरची कारवाई २ जेसीबी, बिगारी सेवक, पोलिस गट यांचे सहाय्याने करण्यात आली. अशी माहिती प्र. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुणे महानगरपालिका यांनी प्रेस नोट द्वारे कळविली.

Post a Comment