सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻झोपडपट्टीतील वापरण्याचा पाणी पुरवठा तोडणाऱ्या व्यक्ती वर गुन्हा दाखल करा.
👉🏻सलग २१ वा दिवस बेमुदत धरणे आंदोलन सुरू
👉🏻प्रशासन गोर गरीब जनतेला त्रास देणार असाल तर आयुक्तांना घेराव.
👉🏻पाण्याचे राजकारण करणाऱ्या वर कारवाई करा : आपचे राजेंद्र साळवे
पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील झोपडपट्टी भागाचा दैनंदिन वापरण्याचा पाणी पुरवठा बंद करणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, झोपडपट्टी भागाला पाणी पुरवठा करणारी विहीर पुणे मनपाने ताब्यात घेऊन गरीब नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे लवकरच आयुक्तांना मांजरी बुद्रुक झोपडपट्टीतील नागरिक घेराव घालणार आहेत. असे आपचे नेते राजेंद्र साळवे यांनी सांगितले.
मांजरी बुद्रुक मधील गावठाण परिसरातील. माळवाडी, कुंजीरवरती, वेताळवस्ती राजीवगांधीनगर, सटवाईनगर (११६, घरकुल, ७२ घरकुल) मांजराईनगर आदि झोपडपट्टी भागामध्ये ग्रामपंचायत काळात खाजगी विहिरीतून पाणीपुरवठा मांजराई देवीसमोरील सार्वजनिक विहिरीत टाकून तेथून वरील भागामध्ये वापरण्याचे पाणी नियमित येत होते. ती खाजगी विहिर प्रतीक घुले व इतर सामाईक यांचे मालकीची होती. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने काम करताना तोडून टाकली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. तक्रार केल्यानंतर पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन माजी जि.प. सदस्य दिलीप घुले व इतर यांचे सामाईक खाजगी विहिरीस जोडली व पाणीपुरवठा झोपडपट्टी परिसरात पूर्ववत सुरू झाला. परंतु १ महिना झाल्यानंतर लाईट बिल थकले. म्हणून पाणीपुरवठा बंद केला गेला. त्यामुळे झोपडपट्टी भागामध्ये वापरण्याच्या पाण्याचे नागरिकांचे हाल होत आहेत. झोपडपट्टीतील वापराच्या पाणी पुरवठा पुणे मनपाने कायद्यानुसार ताब्यात घेऊन जनतेला दिलासा द्यावा.
या मांजरी बुद्रुक मधील ग्रामपंचायत काळात पाणी पुरवठा करण्यासाठी दोन वेळा ठराव झाले. ठरावात पाईपलाईन, वीज मीटर व विद्युत मोटर यावर निधी खर्च करण्यात आला. त्याच अनुषंगाने मांजरी बुद्रुक पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्याने वापरण्याचा पाणीपुरवठा तात्काळ ताब्यात घेऊन झोपडपट्टीच्या नागरिकांना नियमितपणे पाणीपुरवठा चालू करावा. अशी नागरिकांची मुख्य मागणी गेली दोन वर्षांपासून चालू आहे. पुणे मनपा प्रशासन याकडे गांभीयाने पाहत नाही. म्हणून या विरोधात गेली २१ दिवस झाले. आपचे नेते राजेंद्र साळवे यांच्या वतीने मांजराईनगर भागामध्ये बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यास पुणे मनपाच्या आयुक्तांना झोपडपट्टीतील नागरिक घेराव घालणार आहेत.


Post a Comment