सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील दिव्यांग आश्रमाच्या संस्थापिका अध्यक्षा रत्नमाला घुले यांच्या संस्थेला अजित आबा घुले यांनी भेट देऊन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. अजित आबा घुले यांनी वाढदिवसाच्या निमित्तानी दिव्यांग वृध्दाश्रमा भेट देऊन तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला हा वाढदिवस कुठलाही अवाढव्य खर्च न करता आजी आजोबांना वेगवेगळ्या वस्तू देऊन साजरा केला. यावेळी रत्नमाला घुले (दिव्यांग आश्रम संस्थापक), पुनम ताई (अजित) आबा घुले (शारदा उद्योग संस्थापक), वर्षा मोहन गायकवाड (पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस पार्टी उपाध्यक्ष), सुमित्रा राठोड (संस्था सभासद), रतनताई जगताप (शारदा उद्योग व्यस्थापक), ज्योती पानचाळ (शारदा उद्योग सहकार्य), जयश्री गंगोत्री (म्हसोबा प्रतिष्ठान अध्यक्ष), नारी शक्ती महिला मंडळ अध्यक्षा समाजिक कामा अग्रेसर कविता प्रकाश ताकमोके, सुरेखा लोखंडे (सामाजिक कार्यकर्ते), निषा सारवण, खुशी शिंग, उपस्थित होते.
Post a Comment