शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मानव विकास मिशन मधून जिल्हा परिषद शाळा मोरखडक येथे मुलींना सायकलचे वाटप


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज 


पालघर (मोखाडा) - मानव विकास योजनेतून आज दिनांक  ११/४/२०२३ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरखडक येथे मुलींना मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थ यांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले.

           यावेळी मुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला व त्या सायकल शाळेच्या मैदानात विद्यार्थिनींनी व शिक्षकांनीही चालविण्याचा आनंद लुटला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बिन्नर सर, पाटील सर, नवीन कलदुर्के सर, वाणी सर, कविता गामणे मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य  श्रीमती. कुंती खाडम, ग्रामस्थ आत्माराम खाडम हे उपस्थित होते.



           शाळेपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर राहणाऱ्या मुलींना सायकलची सुविधा मानव विकास मिशन ने केली आहे ग्रामीण भागातून शहरे किंवा नजीकच्या खेड्यात जाण्यासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत बस सेवा मानव विकास मिशन अंतर्गत सुरू आहे. तथापि काही ठिकाणी बस फेऱ्या जाऊ शकत नाही. त्यामुळे संबंधित भागातील विद्यार्थिनींना शैक्षणिक प्रवासासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा पाच ते सहा किलोमीटर अंतर पायी चालत शाळेत यावे लागते. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो तसेच त्यांची सुरक्षाही धोक्यात येते ही बाब लक्षात घेऊन मानव विकास मिशन अंतर्गत शालेय प्रवासासाठी विद्यार्थिनींना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. 

           ही योजना फक्त आठवी ते बारावीच्या गरजू विद्यार्थिनींसाठी राबविली जाते.

Post a Comment

Previous Post Next Post