शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कानेगावात भिमजयंती उत्साहात होणार


अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुका असलेल्या कानेगाव या गावातील बौध्द समाजाने गावाला शेवटचा जय भीम करून गाव सोडले होते. या बातमीची दखल प्रथम महाराष्ट्र पोलीस न्युज या मिडियाने घेतली. 

            घडले असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला परवानगी नाकारली होती. तसेच गावातील बौद्ध विहार प्रशासनाने बंद केल्यामुळे  कानेगाव, जिल्हा धाराशिव मधील बौध्दांनी गाव सोडले होते. हे संपुर्ण महाराष्ट्रात समजल्यावर विविध सामाजीक संघटना व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होत होते. या आंदोलनाची दखल घेत बौद्ध समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. व कानेगावात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी देण्यात आली जयंतीची तारीख २६ एप्रिल असुन विविध उपक्रम राबवण्यात येथील असे माणे सर बोलताना म्हणाले. या बौध्द विहाराची केस कोर्टात दाखल असल्यामुळे बौध्द विहाराला पर्यायी जागा देण्यात आली असुन लवकरात लवकर विहाराच्या कामाला सुरुवात करण्यात येईल असे ही प्राथमिक समजते.

Post a Comment

Previous Post Next Post