शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मनपा कमी तिथे आम्ही : राजे कल्ब


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : शेवाळेवाडी येथे जिथे महानगरपालिका यंत्रणा सक्षम नाही. तिथे लोकसहभागातून प्रश्न सोडविण्यासाठी राजे क्लबचा पुढाकार असतो. जिथे मनपा कमी तिथे आम्ही सक्षमपणे नागरिकांच्या सेवेसाठी राजे क्लब सदैव असणार आहे असे राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व शेवाळेवाडी चे माजी उपसरपंच अमित पवार यांनी सांगितले. नुकत्याच महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचे प्रश्न सुटण्याचे काही नाव घेताना दिसत नाही. अवाजवी कर आकारणी आणि सोयी सुविधांचा अभाव हे समीकरण मनपाने अंगिकारल्याचे दिसत असल्याने यामध्ये अजून भर म्हणून की काय शेवाळेवाडी ग्रामपंचायतीने बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. दुरुस्तीसाठी मनपाकडे पुरेसा निधी नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शेवाळेवाडी गावामध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मच्छरांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यासाठी खूप वेळा पाठपुरावा करूनही महानगरपालिकेकडून धूर फवारणी करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत आहे. गेल्या ३ महिन्यात फक्त १ वेळा आणि नावापुरती धुर फवारणी करण्यात आली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून राजे क्लबच्या वतीने नवीन धूर फवारणी मशीन मांजरी व शेवाळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी विनामोबदला उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित परिसरातील किंवा सोसायटीमधील नागरिक राजे क्लबच्या सभासदां समवेत फवारणीसाठी हजर राहून या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत. मच्छरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी राजे क्लब च्या सदस्यांनी स्वखर्चातून फवारणी मशीन नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे मनपा ने शेवाळेवाडी गावातील सी.सी.टी.व्ही. दुरुस्त न केल्यास तेही लोकवर्गणीमधून सी.सी.टी.व्ही. दुरुस्त करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे कर संकलनावर सामूहिक बहिष्कार घालणार आहोत असे अमित पवार म्हणाले. राजे क्लबने नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या पुढाकाराबाबत मांजरी व शेवाळेवाडी परिसरातील नागरिक कौतुक करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post