सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक महादेव नगर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर वाणिज्य विभाग, बीबीए, बीसीए यांच्या वतीने बिजनेस फेअर या उपक्रमाचे आयोजन अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता कौशल्य विकास व्हावा याकरता या उपक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले. यासाठी बी एम सी सी कॉलेज पीएचडी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत साठे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. नितीन घोरपडे, वाणिज्य विभाग प्रमुख आणि उपप्रचार्य डॉ. शुभांगी औटी, उपस्थित होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी विद्यार्थ्यांना बिजनेस फेअर या उपक्रमाबद्दल सखोल असे मार्गदर्शन करून या उपक्रमाचा त्यांच्या भविष्यावर होणारा सकारात्मक उद्योगशील परिणाम याविषयी माहिती दिली. डॉ. प्रशांत साठे यानी भारत हा विश्व गुरुत्वाकडे जात असताना या भारतातील तरुण पिढीतील प्रत्येक तरुणाने उद्योगांमध्ये सहभाग घ्यायला हवा महाविद्यालयाच्या माध्यमातून नवीन उद्योजक घडवण्यासाठी खूप मोलाची अशी साथ मिळते. या उपक्रमासाठी वाणिज्य विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपक्रमामध्ये ३८ व्यावसायिक स्टॉल उभारण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील प्रा. प्रतीक कामथे हे समन्वयक म्हणून काम पाहत होते. त्याचबरोबर वाणिज्य विभागातील सर्वच प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या उपक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉ.नीता कांबळे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार वाणिज्य विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य डॉ. सौ शुभांगी औटी यांनी मानले.





Post a Comment