शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

इफ्तार पार्टीचे आयोजन : शेवाळेवाडी


 सुनिल थोरात

 महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : पवित्र रमजान निमित्त शेवाळेवाडी गावामध्ये शेवाळेवाडी  च्या पोलीस पाटील अमृता खेडेकर यांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले. या कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांसोबत मांजरी पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक भापकर, पोलीस अंमलदार करंजकर, सामाजिक कार्यकर्ते अलंकार खेडेकर, उद्योजक अविनाश भंडारी, यांना आमंत्रित केले. 



        यावेळी भापकर यांनी मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन केले व पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरबुद्दीनभाई इनामदार, नजीरभाई इनामदार, रमजानभाई मुल्ला, मौला नदाफ, शरीफ जाफर शेख, गौबीसहाब मुल्ला, अब्दुलभाई मनियार, युनुसभाई मनियार व त्यांचे सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अलंकार खेडेकर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post