शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

युवकाचा दगडाने ठेचून खुन, बारामती तालुक्यातील सांगवी येथील घटना


 अडागळे सुशिलकुमार 

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे बारामती : बारामती तालुक्यातील सांगवी येथे अज्ञाताने युवकाचा दगडाने ठेवून खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत विनोद हिराचंद फडतरे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. विनोद फडतरे हा युवक सकाळी सांगवी पणदरे रस्त्यावरील शेतात आपली दुचाकी (एमएच ४२ एक्स ६२९५) वरुन गेला होता. त्याठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. या घटनेबाबत माळेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पोलिसांनी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. असल्याची माहिती माळेगाव पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post