शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भिमाई आश्रमशाळेत महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीदिनी अभिवादन


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे इंदापूर : इंदापुर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक  व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 

            यावेळी सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत गौतम बुद्ध मूर्तीस पुष्प, तर राष्ट्रपिता महात्मा फुले व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरेंच्या (तात्या) प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           यावेळी इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे यांनी उपस्थितांना महात्मा फुलेंच्या जयंतीदिनी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव ॲड. समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, प्राध्यापक, शिक्षक, अधिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे  यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post