भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पालघर मोखाडा: दि.११-४-२०२३रोजी सातुर्ली येथील अवकाळी वादळी वाऱ्यासह गारपिटच्या दणक्याने तुकाराम वामन पाटील यांच्या दोन घरांचे छप्पर उडाले असून प्रचंड प्रमाणात घराचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती उपसभापती प्रदीपची वाघ साहेब यांना मिळताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन त्या घटनेची माहिती तहसीलदार यांना दिली असून तातडीने तलाठी यांनी घराची पाहणी केली आहे. त्या घरातील वयोवृद्ध महिला शकुंतलाबाई पाटील व वामन पाटील यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गारपिटचा तडाखा पाहता नुकसानीचे प्रमाण खूप मोठे असून प्रत्यक्ष पंचनामातून स्पष्ट होण्यास मदत होईल तालुक्यात काही भागात अवकाळी पावसाने तडाखा दिला काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला कोणाच्या ध्यानीमनी नसताना भर उन्हाळ्यात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटमुळे काजू,आंबे फळबागांचे नुकसान झाले. शेतकरी पुढील पावसाळी शेतीची तयारीला लागलेला आहे व त्यातून सावरलेला नसतानाच पावसाने हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांवर हे नवीन संकट उभे राहिले आहे.

Post a Comment