शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बॉटनी फेस्ट-२०२३ कार्यशाळा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक परिसरातील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बॉटनी फेस्ट-२०२३ कार्यशाळेचे आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने केले.

            या बॉटनी फेस्ट - २०२३ मध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ प्राध्यापकांची आणि शास्त्रज्ञांची व्याख्याने आणि चर्चासत्रे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शखाली आयोजित करण्यात आली होती. 



             या कार्यशाळेचे उदघाटन  डॉ. श्रीनाथ कवडे यांच्या शुभहस्ते झाले. प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. श्रीनाथ कवडे  यांनी इको - टुरिसम या विषयावर एक कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेमध्ये पर्यावरणाचा समतोल न-बिघडवता टुरिसम कसे करावयास पाहिजे याची सखोल माहिती दिली.

             शारदाबाई पवार महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजकुमार देशमुख यांनी कोणत्याही विषयाचे आकलन कसे होते व प्राविण्य कसे मिळवावे यावर अत्यंत मार्मिकपणे चर्चा करण्यात आली. आबासाहेब गरवारे महाविद्यालय निवृत्त वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्र. के घाणेकर यांचे इतिहास घडवणाऱ्या वनस्पती या विषयावर व्याख्यान झाले. पूर्वी वनस्पतींमुळे कसे युद्धे होत  असत आणि कोणत्या वनस्पतींमुळे, हे अत्यंत सुंदर पद्धतीने इतिहासाचे दाखले देत घाणेकर सरानी हसतखेळत विश्लेषित केले. आघारकर संशोधन संस्था पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. मंदार दातार यांचे वनस्पती शास्त्रातील वर्गीकरणाचा इतिहास या विषयी  माहिती दिली.



           वर्गीकरण का करावेसे वाटले ते वर्गीकरण कसे बदलत गेले. या विषयावर सदर्शन व्याख्यान झाले. यानंतर डॉ. मंदार दातार यांनी वनस्पतींना ओळखायचे कसे ? या विषयावर एक  कार्यशाळा घेतली. ११४ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संयोजनात उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळॆ , उपप्राचार्य प्राध्यापक डॉ. शुभांगी औटी आणि विज्ञान समन्वयक प्राध्यापक डॉ. नेहा पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमांचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्राध्यापक डॉ. किरण रणदिवे, समन्वयक यांनी केले. डॉ. सुनीता दानाई - तांभाळे यांनी सह-समन्वयक म्हणून काम पहिले. त्यांना भावना जगताप व डॉ. अमोल पाटील यांचे सहकार्य लाभले. इतर  संदीपान पवार, विक्रम देशमुख, संजय पवार, बाळासाहेंब खोमणे, आर. बी. पवार, तनुजा शेवाळे व इतर विद्यार्थ्याचे  बहुमूल्य सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी कवडे आणि दिव्या लांडे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post