शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बोगस काम करणाऱ्या जलजीवन मिशनच्या विरोधात आमदारांनी थोपटले दंड : जलजीवन मिशनचे खोदकाम आमदारांनी रोखले


 भाऊ वैजल

महाराष्ट्र पोलीस न्यूज 


पालघर मोखाडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर जल देणारी महत्वाकांक्षी जलजीवन मिशन योजना मोखाडा तालुक्यात चांगलीच वादाच्या भोवऱ्यात  सापडली आहे. 

          पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली संपूर्ण  तालुक्यातील रस्त्याची वाट  लावणाऱ्या ठेकेदाराला वारंवार लोकप्रतिनिधींनी सूचना करूनही आपल्या कामात सुधारणा करत नसल्याने पुन्हा एकदा आमदार सुनील भुसारा हे संतप्त होऊन जलजीवन मिशनचे खोदकाम काम तात्काळ थांबवले. 

         मोखाडा नाशिक या राज्य महामार्गावर नीळमाती लगत उताराला रस्त्याच्या लगत खोदकाम होत असल्याची माहिती आमदार सुनील भुसारा याना मिळताच त्यांनी मोखाडा पोलीस  ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे व पोलीसांची टीम व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पहाणी करून हे काम थांबवण्यात आले आहे

          जल जीवन मिशन योजनेंतर्गत केंद्र शासनाने २०० कोटीच्या आसपास खर्च करून मोखाडा तालुक्यात सर्वत्र नळपाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु ईगल ईन्फ्रा ईडिया या कंत्राटदाराने सर्व नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत खोदाई करून भुमिगत पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्ग, ईतर जिल्हामार्ग तसेच ग्रामीण मार्गालगत लगतच जेसीबी ने खोदाई करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. तर काही ठिकानि रस्त्याची  खोदाई सुरु असून यामुळे  रस्ते ऊखडले आहेत. तसेच पुढील तीस वर्षाची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत असल्याने, रस्ते रुंदीकरण करताना ही पाईपलाईन रस्त्याखाली जाणार आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरणाचे कामे रखडणार असुन नळपाणीपुरवठा योजना नादुरुस्त होणार आहे तसेच रस्ते भुसभुशीत झाले असल्याने पावसाळयात वाहन चालकांना मोठया अपघाताचा सामना करावा लागणार आहे यामुळे आमदार सुनिल भुसारा यांनी वारंवार संबंधित ठेकेदाराला सूचना करूनही  ठेकेदार दुर्लक्ष करत असल्याने हे काम थांबवण्यात आले असून ठेकेदार वर फौजदरी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

          तालुक्यातील १०० किमी पेक्षा अधिक किलो मीटरच्या रस्त्याची जलजीवन  मिशनच्या पाणीपुरवठा योजनेच्या  नावाखाली रस्त्याची वाट  लावली आहे रस्त्याच्या लगत कोणतीही परवानगी न घेता खोदकाम केले असल्याने पावसाळयात  मोठी आपत्कालीन परिस्थिती उदभवणार असून या खोदकामामुळे अनेक ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. परंतु  आम्ही ठेकेदारांना वारंवार सांगूनही ठेकेदारावर सरकारचा  वरदस्त असल्याने ठेकेदार कुणाचे ऐकत नाही परंतु हे आम्ही  खपवून  घेणार नाही. मोदी सरकारची हि महत्वाकांक्षी योजना असली तरी ठेकेदार या योजनेला बासनात गुंढाळण्याचे स्वप्न पहात आहे परंतु आम्ही हे कदापि होऊन देणार नाही ठेकेदाराच्या कामात सुधारणा होत  नाही तो पर्यत मी काम सुरु होऊन देणार नाही. असे विक्रमगड विधानसभचे आमदार सुनील भुसारा यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post