सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हडपसर : मांजरी बुद्रुक येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मांजरी बुद्रुक परिसरातील २७० दिव्यांग बांधव हे संस्थेचे सभासद आहेत.
मांजरी बुद्रुक परिसरातील दिव्यांग बांधवांचे उपजिवीकेसाठी आमदार निधीतील निश्चित रक्कम खर्च करणे शासकीय नियमानुसार अपेक्षित आहे. ती करण्यात यावी. यासाठी हडपसर मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे यांना निवेदन दिले. या निवेदनात जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय ननावरे यांनी आमदार याना गरजू दिव्यांग बांधवाच्या उपजीविकेसाठी वस्तू स्वरूपात मदत व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी व्यवसायकि वस्तुरूपात मदत करावी. सामाजिक बांधलकी या नात्याने त्या वंचित घटकांना, आपल्या आमदार निधी मधून निश्चित रक्कम देण्यात यावी दिव्यांग बांधवांचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी आर्त हाक आमदार चेतन तुपे यांना दिव्यांग बांधवांनी दिली.

Post a Comment