भाऊ वैजल
महाराष्ट्र पोलीस न्यूज
ऱाहुल गांधीवरील कारवाईचा केला निषेध,
पालघर मोखाडा : चोराला चोर म्हणने या कठीण झाले असून महागाईंने उच्चाक गाठला आहे सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे मोदी सरकारमोठ मोठ्या उद्योगपतीसाठी काम करीत आहे देशात जातीय सलोखा बिघडत आहे याला एक शक्ती खतपाणी घालत आहे अशा परीस्थितीत आपला आवाज संसदेत मांडणाऱ्या राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली जाते. हेच मुळात लोकशाही संकटात आल्याचे चित्र असून यासर्व बाबींचा निषेध करावा तेवढा कमी आहे याउलट कॉंग्रेस नेहमीच सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठीच काम करते आणि करीत राहील असा विश्वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी मोखाडा येथे घेतलेल्या पत्रकार परीषदेत केला.
यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा वरीष्ठ उपाध्यक्ष मधुकर चौधरी, जिल्हा बॅंकेचे संचालक निलेश भोईर, तालुकाध्यक्ष जमशीद शेख युवक अध्यक्ष प्रकाश धोडी सामाजिक कार्यकर्ते गिरीश पाटील नगरसेवक वामन हमरे युवानेते सद्दाम शेख, आदि उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने राज्यस्तरावर घेतलेल्या पत्रकार परीषदे नंतर तालुकानिहाय पत्रकार परीषदा घेवून कॉंग्रेसची ध्येय धोरणे राहुल गांधी यांची भूमिका आणि कॉंग्रेस भविष्यात करणार असलेल्या आंदोलनाची माहिती यावेळी पाटील यांनी दिली.यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना पाटिल यांनी सांगितले की फक्त पक्षाचे कार्यक्रमच नाही तर जिल्ह्यातील कुपोषण, पाणी प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न,या स्थानिक आक्रमकपणे लढणार असल्याचे सांगत तालुका निहाय तालुक्यातील प्रश्नांना घेवून या सरकारला जाब विचारणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. देशात अराजक माजले असून जणु काय स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची वेळ आली असल्याचे चित्र असल्याने अशावेळी आम्हाला आमचे मुद्दे प्रकर्षाने मांडण्यासाठी पत्रकार बांधवाची साथ हवी असेही ते म्हणाले.
पालघर लोकसभेच्या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही यावेळी वर्षभरावर येवून ठेपलेल्या लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसची भूमिका काय राहील या प्रश्नावर जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले कि हि जागा पारंपारिक कॉग्रेसची असून यासाठी आम्ही नक्कीच आग्रही राहु मात्र आता महाविकास आघाडी म्हणून हि जागा लढताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी सीपीएम आही सर्व सोबत असल्यामुळे जागावाटपात आणखी वरीष्ठ पातळीवरून काय निर्णय होईल त्यादृष्टीने पुढे कळेलच मात्र यासर्वात कॉंग्रेस पूर्ण ताकदीने लढेल हे नक्की.

Post a Comment