सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पूणे हडपसर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून “समरसता अन्न” या कार्यक्रमअंतर्गत महिला, अंगणवाडीसेविका, स्वयंउद्योजिका, परिचारिका ई. क्षेत्रातील महिला भगिनींचा आदरसत्कार व पाहुणचार करण्यात आला.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार योगेश अण्णा टिळेकर, भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. चित्रा वाघ तसेच पुणे शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा मा. अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रम चे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात सीमा क्षीरसागर, निवेदिता रासंगे, स्वातीताई आल्हाट, वैशाली ताई आल्हाट, वासंती वाकळे, रंजना भोसले, संगीता वतारे प्रभागातील इतर महिला सहभागी झाल्या होत्या.
याप्रसंगी सर्व महिला भगिनींशी विविध विषयांवर गप्पा मारल्या तसेच देशाचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना राबविल्या त्या योजनेची माहिती दिली..

Post a Comment