शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कर्मयोगीचा वारसा पद्माताई भोसले यांच्या प्रयत्नातून शेकडो महिलाना मिळाला रोजगार : इंदापूर


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे इंदापूर : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी अनेक नवीन व्यवसायाची संधी महिलांना मिळावी म्हणून ग्रोफेल गारमेंट मुळे पन्नास महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. दिनदयाळ  उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महामंडळ यातून सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज, सारथी कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता अभियान जावेद हबीब हेअर अँड ब्युटी अकॅडमी, संस्थेमार्फत आर्थिक दुर्बल घटकातील ५००० महिलांना मोफत प्रशिक्षण तसेच १५०० महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

           महिला सक्षमीकरणात इंदापूर तालुका व परिसरात ट्रस्टचे मोलाचे योगदान, शंकरराव पाटील अक्षय शिक्षण योजना, विद्यार्थ्यांसाठी सुरू केली यातून विद्यार्थ्यांना गारमेंट मेकिंग कोर्स, ब्युटी मेकअप आणि हेअर स्टाईल, या प्रकारच्या स्किल्स कोर्स चे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम संस्थेने केले. शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य  केंद्रामार्फत १६००० ऊसतोड मजुरांची तीन वर्षात आरोग्य तपासणी केली. त्यांना मोफत औषधी दिली, त्यांच्यावर योग्य उपचार केले .हे  फार मोठे काम त्यांनी केले.

          ऊसतोड मजुरांसाठी फिरता दवाखाना याची स्थापना केली, परंतु ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणही मिळाले पाहिजे यासाठी शंकरराव पाटील कोपी वरच्या शाळेची (अभ्यास वर्ग) ची सुरुवात ऊसतोड मजुरांच्या कोपी जवळच  केली. ऊसतोड मजुरांच्या मुलांना मुलींना  अक्षर ओळख व्हावी, शिक्षणाची गोडी लागावी, हा उद्देश ताईंचा होता. या विद्यार्थ्यांनी शाळेत यावे शिक्षण घ्यावे म्हणून त्यांना मोफत गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्य, दररोजचा खाऊ वाटप, त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून गॅदरिंग सारखा उपक्रम मुलांसाठी ताईंनी राबवला. हे महाराष्ट्राचे भूषणच आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात अशा ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी शिक्षणाचे द्वार उघडे करणाऱ्या आमच्या त्या माईच आहे. या शाळेत ७० विद्यार्थी  शिक्षण घेतात हे पुण्याचे काम त्यांनीच करू जाणे. ताईंनी पैशाचा विचार न करता ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार केला. आपल्याकडून चांगल्या प्रकारचे शिक्षण आणि आरोग्य याचा लाभ  ऊसतोड मजूर आणि त्यांची मुले यांना लाभ मिळवून देण्याचे काम पहिल्याप्रथम महाराष्ट्रात ताईंनीच केले. याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. 

         विविध उपक्रम ट्रस्टद्वारे राबवले जातात

ताईंचे कार्य महान आहे, त्यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या उपाध्यक्ष आहे भाऊंचे वारस म्हणून त्यांचे कार्य शोभनीय आहे, विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका या योजने अंतर्गत निवासाची जेवणाची व शिक्षणाची सोय करून दिली आहे. करियर मार्गदर्शन व नोकरीची संधी विद्यार्थ्यांना मुलाखत तंत्र व नौकरीची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात त्याचाही लाभ विद्यार्थ्यांना होतो.

           कर्मयोगी शंकराव पाटील यांच्या कन्या म्हणून श्रीमती पद्माताई भोसले या भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करत आहेत्

Post a Comment

Previous Post Next Post