शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उद्योजक, पत्रकार तथा प्रदेश सचिव म्हणून सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये कामं करत असलेले गौतम गवई यांचा वाढदिवस. ६ एप्रिल १९८१ रोजी जन्मलेले गौतम गवई यांनी २००० पासून पत्रकारिता सुरु केली. खैरलांजी चे वृत्तांकन दैनिक वृत्तरत्न सम्राट च्या माध्यमातून त्यांनीच केले. सामाजिक प्रश्नावर आवाज उचलण्याचं कामं गौतम गवई यांनी महानायक या वृत्तपत्रातून केलं. ते मंत्रालय विधिमंडळ पत्रकार म्हणून २००७ ते २०१८ पर्यंत कामं करत होते. आज त्यांनी स्वतः कर्तृत्वावर १४ कोटी चे दोन उद्योग खामगाव जिल्हा बुलढाणा येथे टाकले आहेत. अनेक नव तरुणांना त्यांनी रोजगार दिला आहे.
शेतकऱ्यांच्या टाकाऊ मालाला म्हणजे सोयाबीन कुटार, हरबरा कुटार तसेच सर्व प्रकारच्या शेतीतील टाकाऊ मालापासून बायोमास ब्रिकेट बनवण्याचा त्यांचा उद्योग आहे. समाजकारण व राजकारण तसेच धम्म कारण यात त्यांचा पुढाकार असतो. अशा यशस्वी पत्रकार, उद्योजक ते राजकारणी यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्र पोलीस न्युजच्या टिम मार्फत खूप खूप शुभेच्छा__

Post a Comment