शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागामार्फत हडपसर - रायरेश्वर - हडपसर : सायकल रॅलीचे आयोजन


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


👉🏻सायकल चालवल्यामुळे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राहते - डॉ.  कारभारी काळे


पुणे हडपसर : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हडपसर - रायरेश्वर - हडपसर  या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. 



         या रॅलीमध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालय व परिसरातील इतर महाविद्यालयातील ५० विद्यार्थी व १० शिक्षक सहभागी झाले आहेत. या सायकल रॅलीचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रामॅन (फ्लोरिडा अमेरिका) दशरथ जाधव यांच्या हस्ते व आयर्न मॅन डॉ. शंतनू जगदाळे यांच्या उपस्थितीत  झाला. या प्रसंगी देविदास होले, रणधीर टकले, वैभव पिलाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे उपस्थित होते.



         --ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत--

         दुपारी सायकल रॅलीचे शंकरराव भेलके महाविद्यालय नसरापूर या ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे, अण्णासाहेब मगर प्राचार्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य पुणे विद्यापीठ डॉ. नितीन घोरपडे तसेच स्टाफ मेंबर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांनी  महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित विद्यार्थी  आणि प्राचार्य यांचे स्वागत  केले.

          दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतेश्वर कला महाविद्यालय विंझर यांच्या वतीने सायकल रॅलीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  संजीव लाटे उपस्थित होते.

           अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग च्या वतीने हडपसर सायकल रॅलीचे स्वागत शिवाजी चौक भोर या ठिकाणी करण्यात आले. तसेच शिवाजी चौकामध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे सर यांचा सत्कार डॉ.साळुंखे सर तसेच अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक यांचा सत्कार प्रा. भोसले सर, प्रा. पाटील सर यांच्याकडून करण्यात आला तसेच अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन सायकल रॅली रायरेश्वर कडे प्रस्थान करण्यात आली.



            रॅली कोर्ले रायरेश्वर पायथा या ठिकाणी पोचल्यावर तेथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर यांनी शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी रायरेश्वर येथे मुक्काम करून सकाळी ७ वाजता रॅली केतकावळे च्या दिशेने रवाना झाली. रॅली केतकावळे येथे जेवण करून दुपारी सासवड येथे पोचली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंडित शेळके साहेब यांनी सायकल रॅलीचे स्वागत केले. यावेळी डॉ प्रमोद पाब्रेकर माजी राज्य संपर्क अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे प्रा. अनिल जगताप प्रा राजेश रसाळ  शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ व प्राध्यापक चांगदेव पोमन राहुल जाधव, चंद्रकांत साठी व सायकल मध्ये भाग घेतलेले स्पर्धक. रॅलीचा समारोप महाविद्यालयामध्ये मा. कुलगुरू डॉ.  कारभारी काळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सायकल चालवल्यामुळे व्यायाम होतो. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती राहते असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे उपस्थित होते. 

             रॅलीच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता  कुलकर्णी,  प्रा. प्रितम ओव्हाळ, अमोल गायकवाड, श्रीकृष्ण थेटे, धीरज सोनवणे, राजेंद्र औटे, विशाल कोलते, स्वप्नील सोनवने, अमन शेख, भारती घाडगे,  प्रा. प्रतीक कामठे, प्रा. गौरव शेलार, . चंद्रकांत साठे, श्री. अमोल कचरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post