अतुल सोनकांबळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर : इंदापूर शहरात आंबेडकर नगर जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती विविध उपक्रमासह सादरी करण्यात आली.
माजी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटी, इंदापुर तहसिलदार श्रिकांत पाटील, इंदापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धनवे , नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे, मुकुंद शहा, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, विठ्ठल ननवरे, अरविंद वाघ, शिवाजी मखरे, एडवोकेट राहुल मखरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे, राजवर्धन पाटील, संदीप कडवळे, राजश्री ताई मखरे ,
दादा सोनवणे, कैलास कदम, गजानन गवळी, अतुल शेटे पाटील, सुहास मोरे, हरदास हराळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जेतवन बुद्ध विहार येथे त्रिसरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी अशोक मखरे एड. सुरज मखरे, नरेंद्र शिंदे, हमीद अत्तार, हनुमंत कांबळे, सुनील आरगडे एड.किरण लोंढे, महेश सरवदे, अमोल मिसाळ व आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आनंद मखरे तसेच समीर लोंढे, यशपाल मखरे, सुहास मखरे, सुनील शेळके, अजय कांबळे, शुभम मखरे, नारायण मखरे, सुधीर मखरे यांच्यासह इंदापूर शहरातील आंबेडकरी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते महिला बालक उपस्थित होते.
या जयंतीनिमित्त शहरातून काढण्यात आलेली समता रॅली या कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण ठरली ही समता रॅली इंदापूर शहरातील सर्व नागरिकांचे मन वेधून घेत होती. .


Post a Comment