शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील शेवटच्या माणसाच्या उद्धार व उत्थानासाठी काम केले : डॉ प्रशांत मुळे


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

          पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

              कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपप्राचार्य डॉ प्रशांत मुळे व डॉ शुभांगी औटी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना लिहून आधुनिक भारताच्या निर्मितीचा पाया घातला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी सामाजिक न्याय, समता,  बंधुता यासह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू मानला. राज्यघटनेने सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय मिळाला पाहिजे यासाठी सर्वाना समान संधी बहाल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विचारवंत असून जागतिक पातळीवर त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व स्तरांतील लोकांसाठी काम केले विशेषतः समाजातील शेवटच्या माणसाच्या उद्धार व उत्थानासाठी त्यांनी काम केले. असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे यांनी केले.

              या प्रसंगी प्रा. डॉ. नाना झगडे यांनी मनोगतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियतकालिके व ग्रंथाविषयी माहिती दिली. डॉ. किरण रणदिवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्ययन व व्यवस्थापन याविषयी मनोगतात माहिती दिली.

           या प्रसंगी प्रा. सचिन शहा, डॉ. राजेश रसाळ, प्रा. नितीन लगड,  डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. शैलजा धोत्रे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. सागर कांबळे, डॉ. सुनील वाघमोडे, प्रा. प्रवीण पोतदार, साधना काळभोर, रेखा जंबे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post