शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
नंदुरबार : जुन्या भांडणाच्या कारणावरून नंदुरबार शहरात एकाचा खून झाल्याची घटना रविवारी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चारही संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नंदुरबार शहरातील आंबेडकर चौकातील रहिवासी कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४५) हे उमापती महादेव मंदिर रस्त्याने जात होते. यावेळी चार जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी चार संशयितांनी कृष्णा पेंढारकर यांच्यावर चाकूने वार व लाकडी डेंगाराने मारहाण तसेच पिस्तुलीने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कृष्णा आप्पा पेंढारकर हे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, तालुका पोलीस निरीक्षक राहुल पवार, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, उपनगरचे सपोनि दिनेश भदाणे,शहर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रतापसिंग मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील,सागर आहेर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत कैलास आप्पा पेंढारकर यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार स्वप्नील उर्फ रवी भगवान जावरे, आकाश उर्फ शंकर भगवान जावरे, सागर भगवान जावरे व भगवान गिरधर जावरे या चौघांविरोधात भादवी कलम ३०२, १२०(ब), ३४ सह भारतीय हत्यार कायदा १९५९ चे कलम ३ चे उल्लंघन, २५ व ७ चे उल्लंघन २७ अनवये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment