शुभांगी वाघमारे
महाराष्ट्र पोलीस न्युज
नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारचा ऑगस्ट २०२२ मध्ये पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. या कार्यकाळात मंत्रिपद मिळवून देतो असे सांगून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी महाराष्ट्रात व राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याच अनुषंगाने एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्विय सहाय्यक असल्याचे सांगत या व्यक्तीने ६ आमदारांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी भाजपतील आणखीन आमदार या प्रकाराला बळी पडले आहेत का याचा ही तपास चालू आहे.
भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी ९ - ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा वातावरणात आता मंत्रिपदासाठी घोडे बाजार होत आहे का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. खरच या प्रकारात एवढ्या प्रमाणात पैशाचा वापर होतोय कि काय अशी शंका जनतेच्या मनात नक्कीच येत असणार भापजच्या दोन ते तीन आमदारांनी या व्यक्तीला लाखो रुपये दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणाला अद्यापही दुजोरा दिलेला नाही.
नागपूर पोलिसांनी त्याला गुजरातमधील मोरबीमधून मंगळवारी (ता.१६ ) रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. नीरज सिंह राठोड असे आरोपीचे नाव आहे.
---पक्षनिधी च्या नावाखाली पावणेदोन कोटीचा अपहार--
गेल्या काही दिवसापासून नीरज सिंह राठोड हा फोनवरुन या आमदारांच्या संपर्कात होता. जे पी नड्डा यांचा निकटवर्तीय असल्याचा दावा त्याने केला होता. मंत्रिमंडळात महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी मिळवून देतो, असे त्याने भाजप मधील आमदार यांना सांगितले होते. पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या. असे या आमदारांना या व्यक्ती कडून सांगण्यात आले.
नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. ज्यामध्ये निरज सिंह राठोड नामक व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत मोठ्या रक्कमेची मागणी केली होती. अधिक पोलीस करत आहेत.

Post a Comment