सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात "ए.एम.एम.स्पोर्ट्स कार्निवल २०२३" अंतर्गत १०० क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांचा पुरस्कार वितरण समारंभ महाविद्यालयात नुकताच संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे म्हणून श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. रणजित चामले लाभले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यायाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते.
खेळ हा खेळ म्हणून आपण बघत असलो तरी त्याला काही नियम, चौकटी असतात. या नियमात खेळाडूंना, आयोजकांना खेळ करावा लागतो. या महाविद्यालयात आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा पहिल्या तर हे क्रीडा महाविद्यालय आहे की काय असे वाटते.
श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते, भारतीय धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक प्रा. रणजित चामले प्रतिपादन केले. महाविद्यालयात क्रीडा संस्कृती तयार होणे महत्त्वाचे असते. विद्यार्थ्यांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी या क्रीडा कार्निवलचा निश्चितच उपयोग होईल. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाररिक शिक्षण संचालक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अनिल जगताप, विज्ञान विभागाच्या समन्वयक डॉ. नेहा पाटील, डॉ. नाना झगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन जिमखाना विभागातील खेळाडूंनी केले.


Post a Comment