धनंजय काळे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
पुणे (दौंड) : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाचे उपनेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत कुठेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी उद्धव ठाकरे गटाला एकही जागा दिली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या फोटो व पक्षाचा वापर करून महाविकास आघाडीच्या नावाने निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात एकही जागा ठाकरे गटाला देण्यात आलेली नसताना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला येत होते. उद्धव ठाकरे गटाचे खच्चिकरण करून काँग्रेस राष्ट्रवादीला बळ देण्याच्या या प्रकारामुळे अस्वस्थ व व्यथित होऊन महेश पासलकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असे सांगितले.

Post a Comment